दिवसा दोन घरफोड्या
By Admin | Updated: January 9, 2017 23:37 IST2017-01-09T23:32:08+5:302017-01-09T23:37:28+5:30
बीड : शहरातील फुलेनगर भागातील माऊली संस्कृती अपार्टमेंटमधील दोन घरे फोडून सोमवारी चोरांनी पोलिसांना आव्हान दिले.

दिवसा दोन घरफोड्या
बीड : शहरातील फुलेनगर भागातील माऊली संस्कृती अपार्टमेंटमधील दोन घरे फोडून सोमवारी चोरांनी पोलिसांना आव्हान दिले. यामध्ये लाखोंचा ऐवज लंपास झाला असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोन्या- चांदीचे व्यापारी सचिन कल्याण महामुनी व शिक्षक विष्णू रामप्रसाद चौधरी यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून चोरांनी आत प्रवेश केला. महामुनी दुकानात होते तर त्यांचे कुटुंबिय कीर्तन महोत्सवातील कार्यक्रमासाठी गेले होते. त्यांच्या घरातून चोरांनी २५ ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ५७ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. चौधरी यांचा प्लॅट त्यांच्या समोरच आहे. चौधरी दाम्पत्य शिक्षक असून ते दोघेही शाळेत गेले होते. त्यांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने व रोख १४ हजार रूपये असा अडीच लाखांचा ऐवज चोरांनी लांबविला. तपास फौजदार कैलास बेले हे करत आहेत.
कौडगावात शेतकऱ्याचे घर फोडले
कौडगाव घोडा (ता. परळी) येथे बाबासाहेब सोलनकर यांचे घर फोडून रविवारी चोरांनी ९१ हजार रूपयांचा ऐवज लांबवला. (वार्ताहर)