उद्योगनगरीत घरफोड्या करणारे दोन अट्टल चोरटे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:24 IST2020-12-17T04:24:39+5:302020-12-17T04:24:39+5:30

बजाजनगरातील शैलेश विठ्ठलराव दौड यांचे घर ६ डिसेंबरला चोरट्यांनी फोडले होते. रोख २५ हजार, एक एलईडी टीव्ही असा ऐवज ...

Two burglars arrested for burglary in industrial city | उद्योगनगरीत घरफोड्या करणारे दोन अट्टल चोरटे जेरबंद

उद्योगनगरीत घरफोड्या करणारे दोन अट्टल चोरटे जेरबंद

बजाजनगरातील शैलेश विठ्ठलराव दौड यांचे घर ६ डिसेंबरला चोरट्यांनी फोडले होते. रोख २५ हजार, एक एलईडी टीव्ही असा ऐवज लांबविला होता. दुसऱ्या घटनेत कैलास नारायण सोनवणे (रा.सारा वैभव सोसायटी, वडगाव) यांचे बंद घर फोडून ३३ हजार ९०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला होता. पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गौतम वावळे, सहा.फौजदार प्रभाकर जायभाय, पोहेकॉ.कय्युम पठाण, पोना. प्रकाश गायकवाड, सुधीर सोनवणे, पोकॉ.नवाब शेख, विनोद परदेशी, मनमोहन कोलिमी, रेवन्नाथ गवळे, विक्रम वाघ, दीपक मतलबे आदींच्या पथकाने शुक्रवारी सकाळी बजाजनगर व वडगावात छापा मारला. यानंतर संशयित आरोपी अशोक बागुल (२५ रा.बजाजनगर) व कैलास पाटील (२८ रा.वडगाव) यांना ताब्यात घेतले. अटक केलेले दोन्ही आरोपी रेकाॅर्डवरील गुन्हेगार असून, त्यांच्याविरुध्द सिडको, मुकुंदवाडी, एमआयडीसी सिडकोसह विविध पोलीस ठाण्यांत घरफोडी व चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

फोटो ओळ-

वाळूज उद्योगनगरीत दोन अट्टल चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद करुन त्यांच्या ताब्यातून चोरीचा ऐवज जप्त केला आहे.

Web Title: Two burglars arrested for burglary in industrial city