शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

दुचाकीला धक्का लागल्याने दोघा भावांना बेदम मारहाण; एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 3:03 PM

चाकीचा धक्का लागल्याने शाब्दिक चकमक होऊन दोन भावांना बेदम मारहाण करण्यात आली.

ठळक मुद्देदोघेही मारहाणीनंतर कुणाला काही न सांगता घरी झोपलेएकाला सकाळी त्रास झाल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल केले 

औरंगाबाद : पुंडलिकनगर येथे रविवारी रात्री दुचाकीचा धक्का लागल्याने शाब्दिक चकमक होऊन दोन भावांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत सुनील बाबूराव मुंडलिक (३५, रा. पुंडलिकनगर) याचा मृत्यू झाला, तर संदीप बाबुराव मुंडलिक (३३) हा गंभीर जखमी आहे. तरुणाच्या मृत्यूमुळे पुंडलिकनगर ठाण्यात मंगळवारी सकाळी जमाव जमला. नातेवाईकांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकारदिल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी मनोज जाधव (रा. हनुमाननगर) आणि टिपू शेख याच्यासह सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

पुंडलिकनगर रोडवरील समर्थ कमानीजवळ दुचाकीवरून स्वामी समर्थ कमानीकडे वळण घेत असताना मुंडलिक बंधूच्या वाहनाचा मनोज जाधव याच्या मोटारसायकलला धक्का लागला. यावेळी मुंडलिक बंधू आणि जाधव यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी टिपू आणि त्याचे इतर साथीदार तिथे आले आणि जाधव, टिपूसह सहा ते सात जणांनी मुंडलिक बंधूंना बेदम मारहाण केली. आरोपींनी रॉडने मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीनंतर आरोपी पसार झाले. रात्री अकरा वाजेपर्यंत हा गोंधळ चालू होता.

रात्री अकरा वाजेनंतर सुनील आणि संदीप हे दोघेही घरी जाऊन झोपले. झोपेतच सुनील बेशुद्ध झाला. सोमवारी सकाळी सहा वाजता सुनील बेशुद्धावस्थेत असल्याचे घरच्या मंडळींना लक्षात आले. त्यानंतर त्याला उपचारासाठी सुरुवातीला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल करेपर्यंत दोघांनीही मारहाण झाल्याची माहिती कुटुंबियांना दिलीच नव्हती. एमजीएममध्ये उपचार चालू असताना प्रकृती अधिकच खालावल्याने सुनीलला घाटी रुग्णालयात सायंकाळी सात वाजता दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. सोमवारी सायंकाळी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. सुनीलच्या डोक्याला मार लागला होता, तसेच संदीपच्या पाठीवरही मारहाणीचे व्रण उमटले होते. सुनीलच्या डोक्याला मार कसा लागला याची नातेवाईकांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर संदीपने रविवारी रात्री मारहाण झाल्याची माहिती कुटुंबियांना दिली. 

पोलीस ठाण्यात गोंधळसोमवारी सकाळी सुनीलचे कुटुंबीय आणि नातेवाईक पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात आले आणि दोघा भावांना मारहाण करणाऱ्या टोळक्याला अटक करण्याची, तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. यावेळी नातेवाईकांनी गुन्हेगारांना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. कुटुंबियांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या दिला. सायंकाळपर्यंत या ठिकाणी वातावरण तंग होते. दरम्यानच्या काळात सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र गायकवाड, निरीक्षक एल.ए. शिनगारे यांनी मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याचे आश्वासन कुटुंबियांना दिले. त्यामुळे थोडाफार तणाव निवळला. त्यानंतर सायंकाळी सुनील यांची पत्नी आणि काही नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

टिपू मकोकातील आरोपीमारहाण करणारा टिपू शेख हा कुख्यात गुन्हेगार आहे. मकोका कायद्यानुसार त्याच्यावर खंडणी, प्र्राणघातक हल्ले करणे आदी कारणांवरून कारवाई करण्यात आली होती. दीड महिन्यापूर्वीच तो हर्सूल कारागृहातून बाहेर आला होता.

मृत सुनील इलेक्ट्रिशियनमृत सुनील हे इलेक्ट्रिशियनचे काम करीत होते. दोघे बंधू रविवारी रात्री गजानन महाराज मंदिर चौकात काही कामासाठी बाहेर पडले होते. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हल्ल्याची घटना घडली. सुनील यांच्या पश्चात पत्नी, सात वर्षांची मुलगी आणि पाच वर्षांचा मुलगा, असा परिवार आहे.