सुसाट चोरट्यानी पळविल्या दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:31 IST2020-12-17T04:31:20+5:302020-12-17T04:31:20+5:30

अमोल मनोहर शिंदे (३०, रा. न्यू हनुमाननगर, ) यांनी ३ डिसेंबरच्या रात्री एपीआय कॉर्नरजवळ मोटारसायकल (एमएच-२०-सीजे-८२७८) उभी केली ...

Two bikes stolen by Susat thieves | सुसाट चोरट्यानी पळविल्या दुचाकी

सुसाट चोरट्यानी पळविल्या दुचाकी

अमोल मनोहर शिंदे (३०, रा. न्यू हनुमाननगर, ) यांनी ३ डिसेंबरच्या रात्री एपीआय कॉर्नरजवळ मोटारसायकल (एमएच-२०-सीजे-८२७८) उभी केली होती. ही दुचाकी चोरट्यानी लंपास केली. मन्साराम बताशे प्रसाद (४२, रा. विशालनगर, गारखेडा परिसर) यांच्या घरासमोरुन चोरट्यानी ६ डिसेंबरच्या रोजी त्यांची मोटारसायकल (एमएच-२०-सीएम-३४८५) पळविली.

अन्य एका घटनेत जितेंद्र गंगाधर गोरे ( रा. एन ७ सिडको ) यांची दुचाकी (एमएच-२०-सीडब्ल्यू-७४५३) १७ नोव्हेंबर रोजी शहानूरमिया दर्गा चौकातील एका रसवंतीजवळून चोरट्यानी लंपास केली. अदालत रस्त्यावरील एबीसी कॉंप्लेक्स समोर उभी दुचाकी (एम एच २० डी आर ४५०१) चोरीला गेली. या घटनेविषयी सुदर्शन कडूबा भुसारे (३०, रा. शेंद्राबन एमआयडीसी) यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली.

एका महिलेची दुचाकी (एमएच २० बीजी ७९२२) १३ डिसेंबर रोजी सिडकोतील अजिंठा कॉंप्लेक्सच्या वाहनतळावरून चोरट्यांनी पळविली. वाळूज एमआयडीसीतील सुरेश विजय चव्हाण (२५, रा. जोगेश्वरी) यांची दुचाकी (एमएच-२०-डीएम-६३८०) ११ डिसेंबर रोजी एका कंपनीच्या फाटकासमोरुन चोरट्यांनी चोरून नेली.

........

Web Title: Two bikes stolen by Susat thieves