४७ लाखाचा अपहार करणाऱ्यासह दोन अटकेत
By | Updated: November 26, 2020 04:13 IST2020-11-26T04:13:51+5:302020-11-26T04:13:51+5:30
लिपिक भरत म्हसूजी शिंदे (रा. चौराह )आणि सचिन गणपत शिंदे अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, भरत हा ...

४७ लाखाचा अपहार करणाऱ्यासह दोन अटकेत
लिपिक भरत म्हसूजी शिंदे (रा. चौराह )आणि सचिन गणपत शिंदे अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, भरत हा लोकविकास बँकेच्या सिडको एन ९ शाखेत कार्यरत असतांना त्याने अन्य सहकारी बँक अधिकारी यांच्या संगणकाचा परस्पर वापर करून विविध ग्राहकांच्या खात्यातील ४७ लाख रुपये स्वतःच्या, आईच्या आणि मित्राच्या खात्यात वळते केले होते. हा प्रकार समोर आल्यानंतर १ नोव्हेंबर रोजी सिडको ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक दीपक लंके, हवालदार अरुण वाघ, संजय जारवाल, नितीन घोडके यांच्या पथकाने दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.