दुचाकी चोरीप्रकरणी दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:04 IST2021-06-03T04:04:52+5:302021-06-03T04:04:52+5:30
वैजापूर : स्थानिक पोलिसांनी दोन अट्टल दुचाकी चोरट्यांना गजाआड केले आहे. त्यांच्या ताब्यातून सहा चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. ...

दुचाकी चोरीप्रकरणी दोघांना अटक
वैजापूर : स्थानिक पोलिसांनी दोन अट्टल दुचाकी चोरट्यांना गजाआड केले आहे. त्यांच्या ताब्यातून सहा चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. दादासाहेब काशीनाथ नवगीरे व विशाल भारत म्हस्के (रा.पानगव्हाण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
वैजापूर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास चालू होता. दुचाकींचा शोध घेत असताना वैजापूर ठाण्याचे डीबी पथकाचे पीएसआय जाधव, पोलीस नाईक जालिंदर तमनर, पोलीस अंमलदार विशाल पैठणकर यांच्या पथकाने तपास चक्रे फिरविली. पानगव्हाण येथील दादासाहेब नवगिरे (२२) याने दुचाकी चोरी केली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेतले असता मी मामा मित्र विशाल मस्के याने मिळून चोरी केल्याची कबुली दिली. वैजापूर शहरातून व तालुक्यातील अन्य ठिकाणाहून त्यांनी सात दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यापैकी सहा दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तर उर्वरित दुचाकी जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर कामगिरी पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
फोटो :
020621\img-20210602-wa0273.jpg
सहा मोटरसायकल चोरीप्रकरणी गजाआड केलेली आरोपी दाखवताना पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत व इतर