रेशीम क्लस्टरसाठी मिळाली दोन एकर जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2016 00:30 IST2016-04-12T00:22:37+5:302016-04-12T00:30:41+5:30

जालना : पारंपरिक शेतीसोबतच शेतकरी रेशीम शेती वळले आहेत. उत्पादन बऱ्यापैकी निघून भावही चांगला मिळत असल्याने जालन्यात रे

Two acres of land for the Silk cluster | रेशीम क्लस्टरसाठी मिळाली दोन एकर जागा

रेशीम क्लस्टरसाठी मिळाली दोन एकर जागा


जालना : पारंपरिक शेतीसोबतच शेतकरी रेशीम शेती वळले आहेत. उत्पादन बऱ्यापैकी निघून भावही चांगला मिळत असल्याने जालन्यात रेशीम क्लस्टर उभारणीचे नियोजन काही महिन्यांपूर्वी ठरले होते. शासनाने तसे जाहीर केले. आता क्लस्टर विकासासाठी टीव्ही सेंटर भागात दोन एकर जागा मिळाली आहे.
जालना तसेच मराठवाड्यात उत्पादित झालेले रेशीम कोषाची विक्री करण्यासाठी उत्पादकांना कर्नाटकातील रामनगरम येथे जावे लागते. येथे जाण्यासाठी वाहतूक खर्चही जास्त लागतो.
तसेच पर राज्य असल्यामुळे भाव मिळण्यासही अडचणी येतात. येथील उत्पादकांना जवळच बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून रेशीम क्लस्टरसाठी चाचपणी करण्यात आली होती.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्णयानंतर टीव्ही सेंटर भागातील आयकर कार्यालयासमोरील दोन एक एकर जागा उपलब्ध झाली आहे. ही मार्केटची इमारत असणार असून, यासाठी आरखडा वरिष्ठांना पाठविण्यात आल्याचे जिल्हा रेशीम विकास अधिकरी आर.बी.हांदे यांनी सांगितले.
या ठिकाणी करण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. जागा मिळाली तरी पुढील प्रक्रिया
गतीने पूर्ण होण्याची गरज व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Two acres of land for the Silk cluster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.