घरफोडीतील दोन आरोपी अटकेत
By Admin | Updated: February 10, 2016 00:18 IST2016-02-09T23:54:49+5:302016-02-10T00:18:59+5:30
बीड : अंबाजोगाई, परळी शहरांमध्ये घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या दोघांना पकडण्यात दरोडा प्रतिबंधक पथकाला यश आले.

घरफोडीतील दोन आरोपी अटकेत
बीड : अंबाजोगाई, परळी शहरांमध्ये घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या दोघांना पकडण्यात दरोडा प्रतिबंधक पथकाला यश आले. या पथकाने ७ घरफोड्या उघडकीस आणण्याबरोबरच २५ तोळे सोने त्यांच्याकडून सोमवारी जप्त केले.
विजय ऊर्फ राजा महादेव राठोड (रा. वाघाळा, ता. अंबाजोगाई), मोहन दौलत मुंडे (रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई) अशी आरोपींची नावे आहेत. विजय राठोडने अंबाजोगाईतील ५, तर मुंडेने अंबाजोगाई, परळीतील प्रत्येकी एका ठिकाणी घरफोड्या केल्याचे कबूल केले. राठोडकडून दहा तोळे, तर मुंडेकडून १५ तोळे सोने पोलिसांनी जप्त केले.
राठोडची रवानगी जिल्हा कारागृहात झाली आहे, तर मुंडे हा परळी शहर पोलिसांच्या ताब्यात आहे. दरोडा प्रतिबंधक पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक श्रीकांत उबाळे यांनी अधीक्षक अनिल पारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
बबन राठोड, संजय खताळ, जयसिंग वाघ, बाबासाहेब सुरवसे, गणेश दुधाळ, प्रकाश वक्ते, अशोक दुबाले, हरिभाऊ बांगर, सुबराव जोगदंड, गलधर, चालक रशीद खान यांचा कारवाईत सहभाग होता. (प्रतिनिधी)