गोळीबार प्रकरणात दोघा आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2016 00:29 IST2016-10-31T00:27:25+5:302016-10-31T00:29:07+5:30
लातूर : लातूर शहरातील वाटमारी आणि गोळीबार प्रकरणातील फरार असलेल्या दोघा अट्टल गुन्हेगारांना एमआयडीसी पोलिस पथकाने रविवारी दुपारी शिताफीने पकडले.

गोळीबार प्रकरणात दोघा आरोपींना अटक
लातूर : लातूर शहरातील वाटमारी आणि गोळीबार प्रकरणातील फरार असलेल्या दोघा अट्टल गुन्हेगारांना एमआयडीसी पोलिस पथकाने रविवारी दुपारी शिताफीने पकडले.
लातूर शहरातील स्क्रॅप मार्केट परिसरात एका तरुणावर झालेल्या गोळीबार प्रकरणी आरोपींचा शोध पोलिस घेत होते. दरम्यान, आरोपीने गोळीबार प्रकरणाच्या पूर्वीही गांधी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत अडीच लाखांची लूट केली होती. शिवाय, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या डायरीवरही या आरोपीविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
आरोपी आकाश उर्फ महेश रमेश टेळे (२०, रा. राजे शिवाजीनगर, लातूर), जमीर बिलावर शेख (२३, रा. सिकंदरपूर, ता. लातूर) हे दोघे लातूर शहरात रविवारी दुपारी फिरत असताना पथकाने अटक केली. पथकात डीवायएसपी. मंगेश चव्हाण, सपोनि. सुधाकर बावकर, एएसआय. बिरादार, पोना. कांदे, गणेश यादव, राहुल सोनकांबळे, युवराज गिरी, पी.सी. भुरे आदींचा समावेश आहे.