शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात एकाच ठिकाणी १० तासांत दोन अपघात; दोन्ही वेळा गाड्या उलटल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 18:53 IST

दोन्हीवेळा ऐन रस्त्यात चारचाकी उलटून पडल्याने जालना रोडवरील वाहतूक ठप्प पडली

छत्रपती संभाजीनगर: शहरात वर्दळीच्या जालना रोडवर आज दिवसभरात एकाच ठिकाणी दोनवेळा  वेगवेगळ्या गाड्यांचे अपघात झाल्याची घटना घडली आहे. जालना रोडवरील राज पेट्रोलसमोर हे दोन्ही अपघात झाले आहेत. पहिला अपघात सकाळी साडेआठ वाजता तर दूसरा अपघात सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास झाला. दोन्ही चारचाकी उलटून पडल्याने जालना रोडवरील वाहतूक काही काळासाठी ठप्प पडली होती.

छत्रपती संभाजीनगर ते जालना हा मार्ग शहरातून जात असून मुख्यमार्ग आहे. यावर दिवसरात्र वाहनांची वर्दळ असते. आज सकाळी साडेआठ वाजता एक जीप ( एमएच ४८ - एडब्ल्यू ५५९४)   सेव्हन उड्डाणपूलाकडून सिडकोकडे जात होती. यावेळी राज पेट्रोल पंपसमोर अचानक एक सायकलस्वार समोर जीपच्या समोर आला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने जीप वेगाने बाजूला वळवली. यामुळे दुभाजकावर आदळून जीप उलटली. सुदैवाने सायकल चालक, आणि जीप चालक दोघेही सुखरूप आहेत. या अपघाताने या मार्गवारील वाहतूक तब्बल दोन तास ठप्प. वाहतूक पोलिसांनी क्रेन आणून रस्त्यावरील वाहन दूर केले. 

दरम्यान, याच ठिकाणी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सेव्हन उड्डाणपुलाहून सिडकोकडे जाणारी एसयूव्ही कार (एमएच २० इवाय ७२४४ ) अचानक उलटली. प्राथमिक माहितीनुसार चालकाने वेगात असताना ब्रेक दाबल्याने कार हवेत उडून रस्त्यावर उलटली. या अपघात देखील सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. सायंकाळी वर्दळीच्या वेळी ऐन रस्त्यात कार उलटल्याने वाहतूक ठप्प झाली. सेव्हन उड्डाणपुलावर देखील वाहतूक खोळंबा झाला. 

दोन्ही गाडीत होते फक्त चालकसकाळी आणि सायंकाळी झालेल्या दोन्ही अपघातग्रस्त गाडीत फक्त चालक होते. गाडी उलटल्यानंतर देखील दोन्ही चालकांना सुदैवाने किरकोळ इजा झाली आहे. एकाच ठिकाणी दहा तासांच्या अंतराने गाडी उलटून सारखाच अपघात झाल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. 

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAccidentअपघात