चिमुकल्यांचा किलबिलाट

By Admin | Updated: June 15, 2017 23:41 IST2017-06-15T23:37:01+5:302017-06-15T23:41:29+5:30

नांदेड : उन्हाळी सुट्यांचा आनंद घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी आज शाळेची वाट धरली़

Twitter twitter | चिमुकल्यांचा किलबिलाट

चिमुकल्यांचा किलबिलाट

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : उन्हाळी सुट्यांचा आनंद घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी आज शाळेची वाट धरली़ त्यामुळे ४५ दिवसांपासून शांत राहिलेल्या वर्गखोल्यातून आज किलबिलाट ऐकू आला़ चिमुकल्यांच्या कुठे रडण्याच्या तर कुठे हसण्या, खिदळण्याच्या आवाजाने शाळेचे प्रांगण गजबजून गेले़ जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने शाळेच्या पहिल्या दिवशीच पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देवून पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले़
यंदा शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ १५ जूनपासून होताना शाळा प्रवेश उत्सव साजरा करण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर शिक्षण विभागाने सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्वतयारी केली होती़ त्यानुसार जिल्हा परिषद अध्यक्ष शांताबाई जवळगावकर, उपाध्यक्ष समाधान जाधव, सभापती शीला निखाते, सभापती मधुमती कुंटूरकर, दत्तात्रय रेड्डी, माधवराव मिसाळे तसेच पंचायत समिती सभापती,जि़ प़ व पं़ स़ सदस्य, सरपंच, शालेय शिक्षण समितीचे पदाधिकारी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देवून पाठ्यपुस्तके वितरीत केले़

Web Title: Twitter twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.