ट्रकचालकासह दोघांना बदडले ; दहा जणांवर गुन्हा
By Admin | Updated: December 30, 2015 00:43 IST2015-12-30T00:38:41+5:302015-12-30T00:43:13+5:30
बीड : शहरातून जात असलेल्या ट्रकमध्ये गोमांस असल्याच्या संशयावरून चालकासह दोघांना ८ ते १० जणांनी मारहाण केली. पोलिसांनी हा ट्रक तपासला असता

ट्रकचालकासह दोघांना बदडले ; दहा जणांवर गुन्हा
बीड : शहरातून जात असलेल्या ट्रकमध्ये गोमांस असल्याच्या संशयावरून चालकासह दोघांना ८ ते १० जणांनी मारहाण केली. पोलिसांनी हा ट्रक तपासला असता त्यात बोंबील आढळून आल्याने ट्रकचालक व इतर दोघांना मारहाण करणाऱ्या दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सूरज जयसिंग चुंगडे, विकी दीपकसिंग छानवाल व इतर आठजणांचा आरोपींत समावेश आहे. शहरातून जीजे ४५/८८०९ हा ट्रक चालला होता. जालनारोडवर हा ट्रक आठ ते दहा जणांनी अडवला. गोमांस असल्याचा दावा करत ट्रक चालकास कॅबिनमधून ओढून बाहेर काढले. त्यानंतर ट्रकवर चढून ताडपत्री फाडून मधील मालाची तपासणी केली. तसेच ट्रक चालक व त्याच्या दोन सहकाऱ्यांना दहाजणांनी मारहाण केली. त्यामुळे तणावपूर्ण वातावरण बनले होते. यावेळी शेकडो नागरिक जमा झाले होते. त्यामुळे लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
वाहतूक पोलिसांनी हजेरी लावत तो ट्रक ताब्यात घेतला. जमावाला पांगविल्यानंतर वाहतुक सुरळीत झाली. पोलिसांनी सदरील ट्रक पूर्णत: तपासला असता त्यात कोणत्याही प्रकारचे मांस आढळून आले नाही.
ट्रकमध्ये बोंबील होते. त्यामुळे ट्रक चालक व इतरांना मारहाण करणाऱ्या पियुभाई बाबुभाई सिंगल (रा. जुनागड, गुजरात) यांच्या फिर्यादीवरुन दहाजणांविरुद्ध शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती निरीक्षक उमेश कस्तुरे यांनी दिली. (प्रतिनिधी)