दोनशेवर पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By Admin | Updated: May 11, 2017 23:31 IST2017-05-11T23:26:13+5:302017-05-11T23:31:36+5:30

बीड : जिल्हा पोलीस दलातील २०८ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी अधीक्षक जी. श्रीधर यांनी काढले आहेत.

Twenty-two police personnel shift | दोनशेवर पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या

दोनशेवर पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हा पोलीस दलातील २०८ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी अधीक्षक जी. श्रीधर यांनी काढले आहेत. प्रशासकीय व विनंती बदल्या करण्यात आल्या असून कर्मचाऱ्यांना तातडीने रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.
गृहविभागाच्या सूचनेवरुन ही बदली प्रक्रिया राबविण्यात आली. २० सहायक फौजदारांसह कॉन्स्टेबल, पोलीस नाईक अशा एकूण २०९ जणांच्या बदल्या झाल्या आहेत. एका ठिकाणी एक वर्षांपेक्षा अधिक काळ कर्तव्य बजावणाऱ्या १२ कर्मचाऱ्यांच्या विनंती तर १९६ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. एका ठिकाणी पाच वर्षे सेवा बजावलेले कर्मचारी प्रशासकीय बदलीसाठी पात्र ठरविण्यात आले होते.
बदली प्रक्रियेवेळी अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर अधीक्षक वैभव कलुबर्मे, गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांची उपस्थिती होती. सात दिवसांच्या आत बदलीच्या ठिकाणी रूजू होऊन अहवाल पाठविण्याच्या सूचना अधीक्षक श्रीधर यांनी दिल्या आहेत.

Web Title: Twenty-two police personnel shift