सव्वातीन लाखांचा गुटखा केला जप्त

By Admin | Updated: December 31, 2015 13:49 IST2015-12-31T13:45:24+5:302015-12-31T13:49:52+5:30

अन्न सुरक्षा अधिकारी व परिक्षेत्रीय पोलिस उपधीक्षक यांनी शहरात दोन ठिकाणी छापे टाकून सुमारे ३लाख २८हजार रुपये किंमतीची सुगंधी सुपारी व सुगंधी तंबाखू जप्त केली

Twenty-three lakhs of gutkha seized | सव्वातीन लाखांचा गुटखा केला जप्त

सव्वातीन लाखांचा गुटखा केला जप्त

 तुळजापूर : अन्न सुरक्षा अधिकारी व परिक्षेत्रीय पोलिस उपधीक्षक यांनी शहरात दोन ठिकाणी छापे टाकून सुमारे ३लाख २८हजार रुपये किंमतीची सुगंधी सुपारी व सुगंधी तंबाखू जप्त केली. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी करून तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, राज्यात गटखा, पान मसाला, सगंधी सुपारी खर्रा याच्या साठा, वाहतूक, उत्पादन व विक्रीस बंदी असतानाही शहरातील जुन्या बसस्थानकासमोर असलेल्या शिवानंद पान शॉप या दुकानात शिवानंद नागनाथ शिंदे (रा.बसवंतवाडी, ता.तुळजापूर)यांनी दुकानामध्ये सुगंधी तंबाखू व सुगंधी सुमारीचा साठा करून ठेवला होता.अन्न सुरक्षा अधिकारी व परि.पोलस उपअधीक्षक विशाल हिरे यांनी या ठिकाणी छापा मारून सुमारे २४हजार १५३रुपये किंमतीचा हा माल जप्त केला.याप्रकरणी शिवानंद शिंदे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास परि.पोलस उपअधीक्षक विशाल हिरे करीत आहेत.
दरम्यान, शहरातील नळदुर्गरोडवरील एसटी कॉलनीतील रमाकांत प्रभाकर कदम यांच्याकडे देखील ३लाख ४हजार ६५0रुपये किंमतीची सुगंधी सुपारी, सुगंधी तंबाखू व गुटखा असा माल आढळून आला.याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी रमाकांत महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि अनिल किरवाडे करीत आहेत.(वार्ताहर) गुल्हा दाखल ■ अन्न सुरक्षा अधिकारी व परिक्षेत्रीय पोलिस उपाधीक्षक यांनी केली कारवाई.
■ नळदुर्ग शहरातील एसटी कॉलनी परिसरातही मारण्यात आला छापा.

Web Title: Twenty-three lakhs of gutkha seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.