ठिबकच्या लाभार्थ्यांचे १२ कोटी थकले
By Admin | Updated: July 23, 2016 00:57 IST2016-07-23T00:38:32+5:302016-07-23T00:57:30+5:30
लातूर : ठिबकच्या लाभार्थ्यांना तत्काळ निधी द्यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयात आंदोलन करण्यात आले़

ठिबकच्या लाभार्थ्यांचे १२ कोटी थकले
लातूर : ठिबकच्या लाभार्थ्यांना तत्काळ निधी द्यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयात आंदोलन करण्यात आले़
कृषी विभागाकडून राबविण्यात आलेल्या अनुदानावरील ठिबक सिंचन योजनेंतर्गत जिल्ह्यात जवळपास ८ हजार शेतकऱ्यांनी ठिबकची खरेदी केली़ २०१३-१४ साली मंजूर करण्यात आलेल्यांपैकी ५२ टक्के लाभार्थ्यांना अद्याप एक रूपयाही मिळाला नाही़ जवळपास १२ कोटी रुपये अनुदान रखडले आहे. हे अनुदान त्वरीत देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष नागरगोजे, भास्कर औताडे, शिवकुमार नागराळे, भागवत शिंदे, अॅड़ बालाजी चापोलीकर, लता गायकवाड, प्रमोद जोशी, फुलचंद कावळे, नितीन ढमाले, बजरंग ठाकूर, किसन कदम, मनोज अभंगे, किरण चव्हाण, भागवत कांदे, संपत्ती खुने, इलियास पठाण आदींची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)