आठ दिवसात बारा जणांचा अपघातात मृत्यू
By Admin | Updated: June 20, 2014 00:44 IST2014-06-19T23:40:58+5:302014-06-20T00:44:45+5:30
शिरीष शिंदे , बीड धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग बीड जिल्ह्यातून गेला आहे. या राष्ट्रीय महामार्गावर अपघात होणे हे जणू समीकरणच बनले आहे.

आठ दिवसात बारा जणांचा अपघातात मृत्यू
शिरीष शिंदे , बीड
धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग बीड जिल्ह्यातून गेला आहे. या राष्ट्रीय महामार्गावर अपघात होणे हे जणू समीकरणच बनले आहे. गेल्या आठ दिवसात या रस्त्यावर तिन मोठे अपघात झाले असून या अपघांतामध्ये बारजण ठार झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. हा महामार्ग म्हणजे मृत्यूचा मार्ग बनला आहे की काय अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
बीड शहरापासून आठ ते दहा अंतरावर असलेल्या नामलगाव फाटानजीक १२ जून रोजी उभ्या ट्रकवर जीप आदळून आठजण ठार झाले होते. ही घटना ताजी असतानाच रविवारी सकाळी नाशिक येथील भाविक तुळजापूर येथे देवदर्शनासाठी जाताना बीड तालुक्यातील रौळसगावनजीक जीपला अपघात झाला. या अपघाता दोनजण जागीच ठार झाले होते. त्यातच बुधवारी सकाळी ट्रक-कंटनेरचा अपघात होऊन दोन ठार झाल्याची घटना घडली. या महामार्गावर नेहमी होणाऱ्या अपघातांमुळे या रस्त्यावरुन जाणाऱ्यां प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अपघात सत्र चालूच असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. मोठ्या अपघातांसह दुचाकी अपघात होण्याची संख्या अधिक आहे. काही दिवसापूर्वी बीडहून गढी फाट्यावरुन माजलगावकडे निघालेल्या दुचाकीला रांजणी परिसरात ट्रकने धडक दिली होती. मोठी वाहने दुचाकीला धडक देण्याच्या घटना या धुळे-सोलापूर महामार्गावर यापुर्वी अनेकवेळा घडलेल्या आहेत.
आता खऱ्या अर्थाने चौपदरी करणाची गरज
धुळे-सोलाप्ूुर महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे यापूर्वी जाहीर झाले आहे. हे काम सुरु ३० जून पर्यंत सुरु होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली. या महामार्गावर अधिक अपघात होत असल्याने खऱ्या अर्थाने चौपदरी रस्ता होण्याची गरज निर्माण झाली आहे. अपघात होण्याची संख्या वाढली तर आहेच शिवाय मोठे अपघात होऊन मृतांची संख्याही वाढतच असल्याचे समोर येत आहे. दर दोन ते चार दिवसाला जिल्ह्यातून गेलेल्या महामार्गावर अपघात होत आहेत.
भूसंपादनाचे काम सुरुच
चौपदरीकरणाच्या कामासाठी प्रशासनाच्यावतीने भूसंपादनाचे काम अंतीम टप्प्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या हरकती व म्हणणे ऐकून घेऊन ही प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मोठ्या वाहनाने धडकून अपघातांत
जखमी होणाऱ्यांची संख्या अधिक
जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग गेला असल्यामुळे ट्रक, कंटेनर, मालवाहू ट्रक या वाहनांची नेहमीच ये-जा असते. लांब टप्पा असल्याने मोठ्या वाहनाचे चालक वेगाने गाड्या चालवितात. रस्ता लहान असल्याने बहुतांश वेळा लहान वाहनधारकांना रस्ता सोडून चालावे लागते. दुचाकी वाहनधारक त्यांच्या मार्गाने योग्य पद्धतीने जात असले तरी त्यांच्यावर धोका कायम असतो. दुचाकीला मागच्या बाजूने मोठ्या वाहनाने धडक दिल्याच्या अनेक घडल्या आहेत. चुकी असो वा नसो या महामार्गावर दुचाकी वाहनधारकांना धोका कायम असतो. अपघातात वाढ होत असल्याने या महामार्गावर चौपदरीकरणाचे काम तात्काळ सुरु होणे आता काळाची गरज बनली आहे. याकडे गांभिर्याने पहाण्याची हीच वेळ असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.