ग्रामीण आरोग्य सेवेचे वाजले बारा

By Admin | Updated: December 26, 2014 00:15 IST2014-12-26T00:14:45+5:302014-12-26T00:15:12+5:30

लोकमत टीम औरंगाबाद : आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी बेभानपणे वागत असल्याचे चित्र लोकमतने बुधवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले आहे.

Twelve monthly services for rural health | ग्रामीण आरोग्य सेवेचे वाजले बारा

ग्रामीण आरोग्य सेवेचे वाजले बारा

लोकमत टीम
औरंगाबाद : ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी बेभानपणे वागत असल्याचे चित्र लोकमतने बुधवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ४९ प्राथमिक आरोग्य केंद्रांत कार्यरत असलेले बहुतेक वैद्यकीय अधिकारी हे अप-डाऊन करीत असल्याचे दिसून आले. परिणामी सामान्य रुग्णांना सरकारी रुग्णालयात डॉक्टर नाही, असे सांगून परत पाठविले जाते. अनेक ठिकाणच्या प्रा.आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळेही रुग्णांना खाजगी डॉक्टरांची दवाखान्यांची दारे ठोठवावी लागत आहेत.

Web Title: Twelve monthly services for rural health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.