टीव्ही म्हणजे कुबेराचा खजिना नव्हे,त्यापासून दूर रहा
By Admin | Updated: September 14, 2015 23:30 IST2015-09-14T23:30:13+5:302015-09-14T23:30:13+5:30
जालना: अमेरिकन व्यक्तींनी टिव्हीची तुलना इडीएट बॉक्स म्हणून केलेली असली तरी आज टिव्ही भारतीयांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे.

टीव्ही म्हणजे कुबेराचा खजिना नव्हे,त्यापासून दूर रहा
जालना: अमेरिकन व्यक्तींनी टिव्हीची तुलना इडीएट बॉक्स म्हणून केलेली असली तरी आज टिव्ही भारतीयांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. टीव्ही चांगला की वाईट यापेक्षा आपण त्यातून काय घेतो हा खरा प्रश्न आहे. मात्र टिव्हीतून चांगले काही मिळण्याऐवजी त्याचे दुष्पपरिणाम समोर आल्यानंतर मन व्यथीत होऊन जाते. कुबेराचा खजिना लुटण्यासाठी जशी स्पर्धा लागते, तसेच आम्ही टीव्हीला चिकटून बसू लागलो आहोत. मात्र टीव्ही हा काही कुबेराचा खजाना नाही. चांगल्या पेक्षा वाईटचाच जास्त भरणा असून समाज व्यवस्थेचे जे चित्रण आपण पाहात ते भयानक असून त्याला टिव्ही कारणीभूत आहे. त्यामुळे टीव्हीपासून दूरच रहा, असा हितोपदेश श्रमण संघीय मंत्री प्रवर प. पू. श्री. आशीषमुनी म. सा. यांनी येथे बोलतांना केला.
यावेळी विचारपीठावर उदीयमान संत, श्रमण संघक्षय तत्व चिंंतक प. पू. श्री. उत्तममुनिजी म. सा. गुरु निहाल सुनु डॉ. प. पू. श्री. पद्मामुनि जी म. सा. शास्त्री तसेच कण्ठ कोकिळा प. पू. महासाध्वी श्रुति जी म. सा., यांची उपस्थिती होती.
आज सोमवारी काय टीव्ही वरदान आहे? या विषयावर बोलतांना प. पू. श्री. आशीषमुनी म्हणाले की, सुख हे आपल्या विचारात आहे. ऊसाच्या वाढ्यातही रस असतोच मात्र त्यात गोडी नाही. उसाच्या कांडीत गोडी आहे. प्रवचनाला येणाऱ्यांची संख्या जस- जशी वाढू लागली आहे तशी गोडी प्रवचनात देखील आहे. साधना, चिंंतन आणि मनन सोडून आम्ही भटकत आहोत. राग आणि व्देषाच्या कैचीने आमचा विकास खुंटू लागला आहे. त्यासाठी कमीत कमी उपासना तरी करा! बागेत काम करणारा ङ्कमाळी दररोज हसत आणि अगदीच आनंदीत राहून बागेची देखभाल करतो. हे दृष्य मालक दररोज पाहतो.
त्याला वाटतं आपण मालक असूनही आपल्या चेहऱ्यावर हसू नाही. आणि हा मात्र अगदीच आनंदीत राहून आपलं काम करत आहे. असं का? खरं तर सुख हे धन- संपत्तीत नसून आपल्या विचारात आहेत. आम्ही चिंंतन, मनन आणि साधनाही सोडून दिली आहे. कातण काढून टाकल्यानंतर साप ज्या गतीने पळतो तीच गती सत्संगातून मिळते. कातण काढण्यापूर्वी सापाची गती खुंटते, अगदी आमचंही असंच आहे. आमची गती खुंटली आहे. कातण अर्थात आळस, व्देष आणि रागाला फेकून द्या आणि परिणाम पहा! साधना करण्यासाठी साधू- संतच व्हावं लागतं असं काहीही नाही. नीती बदला, विचार बदला, सर्वकाही ठिक होईल, असे सांगून प. पू. श्री. आशीषमुनीजी म्हणाले की, आपल्या दृष्टीवर बरंच काही अवलंबून आहे. आपण काय पाहतो, कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो.
ज्या टिव्हीची तुलना अमेरिकेने इडीएट बॉक्स म्हणून केली तीच टिव्ही भारतीयांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनली आहे. टीव्हीने घरदार दूषीत केलीत. भाऊ- बहिणीचं नातं कलंकीत केलं, अशा टीव्हीतून हेच घडणार असेल तर भावी पिढीचं काय होणार? काही तरी विचार करा, असा प्रश्नही प. पू. श्री. आशीषमुनीजींनी केला. ( प्रतिनिधी)