लाखोंची उलाढाल; सुशिक्षितही पडले बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2017 00:03 IST2017-01-07T00:00:49+5:302017-01-07T00:03:10+5:30
बीड : गर्भलिंग निदान व गर्भपातासाठी महिलांना परप्रांतात नेणारे रॅकेट सक्रिय असल्याचे ‘लोकमत’ने शुक्रवारी स्टींगद्वारे उजेडात आणले.

लाखोंची उलाढाल; सुशिक्षितही पडले बळी
बीड : गर्भलिंग निदान व गर्भपातासाठी महिलांना परप्रांतात नेणारे रॅकेट सक्रिय असल्याचे ‘लोकमत’ने शुक्रवारी स्टींगद्वारे उजेडात आणले. त्यानंतर या रॅकेट संदर्भात अनेक रंजक माहिती समोर येत असून, महिन्याकाठी लाखोंची उलाढाल या माध्यमातून होत आहे. एवढेच नव्हे तर यात सुशिक्षितही बळी पडले आहेत. पुत्र हव्यासापोटी भ्रूण हत्या थांबलेल्या नाहीत हे वास्तव पुढे येत आहे.
‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. आरोग्य वर्तुळही हादरून गेले. या रॅकेटमध्ये वाहनचालकांसोबत आणखी कोण सहभागी आहेत ? याचा उलगडा झाल्यास अनेक खळबळजनक बाबी उघड होऊ शकतात. जिल्हा प्रशासन हे प्रकार रोखण्यासाठी नेमके काय पाऊल उचलते याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)