नरसी रस्त्यावरील टोलधाड बंद करावी

By Admin | Updated: June 24, 2014 00:35 IST2014-06-24T00:35:40+5:302014-06-24T00:35:40+5:30

जळकोट : शिरूर ताजबंद-मुखेड-नरसी दुपदरीकरण रस्त्याचे काम पूर्ण होण्याआधीच जळकोट तालुक्यातील उरमगा येथे पथकर नाका उभारून वाहनधारकांकडून टोलधाड सुरू केली आहे.

Turn off the towels on the narrow streets | नरसी रस्त्यावरील टोलधाड बंद करावी

नरसी रस्त्यावरील टोलधाड बंद करावी

जळकोट : शिरूर ताजबंद-मुखेड-नरसी दुपदरीकरण रस्त्याचे काम पूर्ण होण्याआधीच जळकोट तालुक्यातील उरमगा येथे पथकर नाका उभारून वाहनधारकांकडून टोलधाड सुरू केली आहे. त्यामुळे ही टोलधाड बंद करावी, अशी मागणी आमदार सुधाकर भालेराव यांनी केली आहे.
नरसी (जि. नांदेड) ते शिरूर ताजबंद (जि. लातूर) या १०५.२० किलोमीटर अंतराचे काही दिवसांपूर्वी या रस्त्यावर १९०.११ कोटी रुपये खर्च करून दुपदरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय मुंबई अंतर्गत मे. कल्याण टोल हायवेज प्रा.लि. यांच्या वतीने करण्यात आले. सदरील दुपदरीकरण रस्त्यावरील पुलाचे काम अर्धवट तसेच शिरूर ताजबंद रस्त्यावरील दोन किलोमीटर अंतरावरील रस्त्याचे कामही अर्धवट असून, वाहनधारकांना टोलधाड मात्र सुरू केली आहे. त्यामुळे सदरील रस्त्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय टोलधाड सुरू करू नये व झालेल्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी आमदार सुधाकर भालेराव यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Turn off the towels on the narrow streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.