चोंढी टोकनाका बंद
By Admin | Updated: July 1, 2014 00:13 IST2014-07-01T00:10:28+5:302014-07-01T00:13:46+5:30
हिंगोली : औंढा नागनाथ - वसमत या रस्त्यावर चोंढीजवळ असलेला टोलनाका सोमवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून बंद करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहेत.
चोंढी टोकनाका बंद
हिंगोली : औंढा नागनाथ - वसमत या रस्त्यावर चोंढीजवळ असलेला टोलनाका सोमवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून बंद करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहेत. त्यामुळे यापुढे वाहनधारकांना येथे टोल भरण्याची गरज नाही.
औंढा नागनाथ- वसमत रस्त्याचे बीओटी तत्वावर खासगी कंत्राटदाराकडून काम करण्यात आले होते. २६ फेब्रुवारी २००३ पासून चोंढीजवळ मे. कल्याण टोल इन्फ्रा लिमिटेड या कंपनीकडून या खासगी तत्वावर करण्यात आलेल्या रस्त्याच्या मोबदल्यापोटी टोल वसूली सुरू करण्यात आली होती. २६ फेब्रुवारी २०१७ पर्यंत ही टोल वसूली सुरू राहणार होती; परंतु राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी राज्यातील काही टोल बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये औंढा- वसमत रस्त्यावरील चोंढी टोलनाक्याचा समावेश होता.
या अनुषंगाने २७ जून रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने ३० जून रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून हा टोलनाका बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता १ जुलैपासून या रस्त्यावरील टोल वसूली बंद होणार आहे. यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
११ वर्षांपासूनची वसूली बंद
जिल्ह्यात औंढा नागनाथ - वसमत या रस्त्यावर २० कि.मी. अंतराचे काम ५ कोटी ५० लाख रुपये खर्चून बीओटी तत्वावर करण्यात आले होते.
या रस्त्याच्या कामापोटी २६ फेब्रुवारी २००३ पासून खासगी कंपनीकडून सुरू होती टोल वसूली.
२६ फेब्रुवारी २०१७ पर्यंत चालणार होती टोल वसूली.
राज्य शासनाने गेल्या महिन्यात राज्यातील कमी कालावधी राहिलेले टोल बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील चोंढी येथील टोलनाक्याचा समावेश होता.