तुळजापुरात भाविकांची मांदियाळी
By Admin | Updated: October 2, 2014 00:36 IST2014-10-02T00:33:31+5:302014-10-02T00:36:19+5:30
तुळजापूर : महाराष्ट्राचे कुलदैवत श्री तुळजाभवानी व स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अतुट नात्याचा प्रसंग म्हणून

तुळजापुरात भाविकांची मांदियाळी
तुळजापूर : महाराष्ट्राचे कुलदैवत श्री तुळजाभवानी व स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अतुट नात्याचा प्रसंग म्हणून श्री तुळजाभवानी मातेची भवानी तलवार अलंकार महापुजा बुधवारी मांडण्यात आली होती. या महापुजेचे लाखो भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणून गेला होता.
बुधवारी शारदीय नवरात्रोत्सवातील सातव्या दिवशीही पायी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय होती. उस्मानाबाद रस्त्याने बुधवारी पहाटेपर्यंत हजारो भाविक पायी येत होते. यात विशेषत: महिला व तरूणींचे प्रमाण मोठे होते. नळदुर्ग रस्त्यावर कर्नाटक व तेलंगणा राज्यातील तरूण भाविकांची पायी येतानाची संख्या मोठी दिसत होती. नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन मंदिर संस्थानने रात्री एक वाजता चरणतीर्थ पूजा विधी घेऊन भाविकांना देवीचे दर्शन खुले केले. सकाळी सहा वाजता नित्योपचार अभिषेक पूजा होऊन दुपारी सातव्या दिवशी मातेची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली.
बुधवारी पायी येणाऱ्या भाविकांसह विविध वाहनांतून येणाऱ्या भक्तांची संख्याही लक्षणीय होती. त्यामुळे शहर व परिसरात खाजगी वाहने मोठ्या प्रमाणात दिसून येत होती.
गुरूवार २ आॅक्टोबर रोजी महादुगाष्टमी आणि सुटीचा दिवस आहे. त्यामुळे शहरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने प्रशासनासोबतच व्यापाऱ्यांनीही तयारी करून ठेवली आहे.
४एसटी महामंडळाने जादा बसगाड्यांची सोय केली असली तरी कर्नाटक, सोलापूर व उस्मानाबाद येथील आगारांमध्ये समन्वय नसल्यामुळे बसगाड्यांच्या दोन-दोन रांगा रांगल्याचे दिसून आले. यामुळे या ठिकाणी वारंवार वाहतूक जाम होत होती.
४श्री तुळजाभवानी मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष दृष्टांत देऊन स्वराज्याच्या निर्मितीसाठी व संरक्षणासाठी प्रसाद म्हणून तलवार दिली होती. शिवरायांनी ती विनम्रपणे स्वीकारली. तीच ही भवानी तलवार होय.