तुळजापूर-सोलापूर मार्गही गर्दीने फुलला

By Admin | Updated: October 1, 2016 01:12 IST2016-10-01T00:58:01+5:302016-10-01T01:12:42+5:30

तामलवाडी: तुळजाभवानी शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त भवानीज्योत आणण्यासाठी तुळजापूरला जाणारे देवीभक्त व त्यांच्या वाहनांनी तुळजापूर-सोलापूर रस्ता अक्षरश:

The Tuljapur-Solapur route also got crowded | तुळजापूर-सोलापूर मार्गही गर्दीने फुलला

तुळजापूर-सोलापूर मार्गही गर्दीने फुलला


तामलवाडी: तुळजाभवानी शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त भवानीज्योत आणण्यासाठी तुळजापूरला जाणारे देवीभक्त व त्यांच्या वाहनांनी तुळजापूर-सोलापूर रस्ता अक्षरश: गर्दीने फुलून गेला आहे. ‘आई राजा उदो..उदो’च्या जयघोषाने वातावरण दुमदुमले आहे. यात कर्नाटक व पश्चिम महाराष्ट्रातील नवरात्रोत्सव मंडळांची संख्या अधिक होती.
शारदीय नवरात्रोत्सवास शनिवारी प्रारंभ आहेत आहे. त्यामुळे सर्वपित्री अमावस्येपासून भवानीज्योत घेऊन जाण्यासाठी मंडळांची वाहने तुळजापूरकडे वाजता-गाजत जात होती. भवानीज्योत तुळजापुरात प्रज्वलित करून ती गावाकडे नेली जाते. नवरात्रोत्सव मंडळामध्ये कर्नाटकसह पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, कऱ्हाड, विजापूर आदी भागातून येणाऱ्या नवरात्रोत्सव मंडळांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले.
जड वाहतुकीस बंदी
शुक्रवारी दुपारपासून तुळजापूर-सोलापूरमार्गे जाणारी जडवाहतूक गर्दीच्या कारणावरून बंद करण्यात आली होती. भवानीज्योत यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न केला जात होते. तर रुंदीकरणाच्या कामामुळे वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागल्याचे दिसून आले. (वार्ताहर)

Web Title: The Tuljapur-Solapur route also got crowded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.