तुळजापुरात राष्ट्रवादी स्वबळावर लढणार

By Admin | Updated: July 2, 2014 00:22 IST2014-07-01T23:32:52+5:302014-07-02T00:22:35+5:30

तुळजापूर : मित्रपक्ष म्हणत असले तरी काँग्रेस कुठल्याही निर्णयप्रक्रियेत राष्ट्रवादीला सोबत घेत नाही.

In Tuljapur, the NCP will fight on its own | तुळजापुरात राष्ट्रवादी स्वबळावर लढणार

तुळजापुरात राष्ट्रवादी स्वबळावर लढणार

तुळजापूर : मित्रपक्ष म्हणत असले तरी काँग्रेस कुठल्याही निर्णयप्रक्रियेत राष्ट्रवादीला सोबत घेत नाही. उलट काँग्रेसची भूमिका सातत्याने आघाडीविरोधातच राहिली असल्याचा आरोप करीत आगामी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रसने स्वतंत्रपणे लढण्याची आग्रही मागणी मंगळवारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली. यावर आपल्या भावना पक्षश्रेष्ठींना कळवू, स्वतंत्रपणे निवणूक लढण्यासाठी ताकदीने मैदानात उतरण्याचा शब्द देत, कार्यकर्त्यांनी त्यासाठी कामाला लागावे असे आदेश माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांनी दिले. सुमारे सहा तास ही मॅरेथॉन बैठक चालली.
तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक मंगळवारी येथील विश्रामगृहावर पार पडली. अध्यक्षस्थानी राणाजगजितसिंह पाटील होते. यावेळी त्यांनी जि. प. गटनिहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आढावा घेतला. त्यावेळी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी मित्रपक्ष काँग्रेस नेत्यांच्या कार्यपध्दतीवर वागणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. तुळजाभवानी साखर कारखाना पूर्ण बंद करून अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे दिले. राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा मलिन करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न काँग्रेसने केल्याचा आरोप करीत, यापुढे राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी केला. याबरोबरच मागील काही वर्षात काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना कशा पध्दतीने डावलले जात आहे. त्याचा पाढाही वाचला.
कार्यकर्त्यांच्या भावना ऐकूण घेतल्यावर राणाजगजितसिंह पाटील यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या भावनाशी सहमती दर्शवीत आपल्या भावना पक्षश्रेष्ठींना कळविण्याचा शब्द दिला. तसेच आगामी विधानसभा निवडणूकीसाठी जोमाने कामाला लागण्याचे निर्देश दिले. यशाला काँग्रेस आणि अपयशाला राष्ट्रवादी जबाबदार ही दूटप्पी भूमिका यापूढे चालणार नाही. असे खडसावत आगामी विधानसभा स्वबळावर लढण्यासाठी सज्ज व्हा असे आदेश त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना दिले. या बैठकीस तालुकाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, अ‍ॅड. दीपक आलुरे, गोकुळ ंिशंदे, प्रभारी नगराध्यक्ष गणेश कदम, विनोद गंगणे, अच्युत वाघमारे, संजय देशमुख, संजय जाधव, विक्रम देशमुख, बलभीम लोंढे, शिवाजी मोटे, दिलीप गंगणे, महेश चोपदार, शिवदास कांबळे, सिद्धू कोरे, नय्यर जहागीरदार यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, नगरसेवक, युवक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: In Tuljapur, the NCP will fight on its own

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.