‘शिवस्मारकात उभारणार तुळजाभवानीचे मंदिर’
By Admin | Updated: January 1, 2017 23:36 IST2017-01-01T23:28:55+5:302017-01-01T23:36:06+5:30
तुळजापूर : अरबी समुद्रात होत असलेल्या शिवस्मरकामध्ये श्री तुळजाभवानीचे मंदिरही उभारण्यात येणार आहे.

‘शिवस्मारकात उभारणार तुळजाभवानीचे मंदिर’
तुळजापूर : अरबी समुद्रात होत असलेल्या शिवस्मरकामध्ये श्री तुळजाभवानीचे मंदिरही उभारण्यात येणार आसल्याची माहिती आर्ट डायरेक्टर नितीन देसाई यांनी दिली.
देसाई हे रविवारी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आले होते. यावेळे ते पत्रकारांशी बोलत होते. अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या तुळजाभवानी मंदिराचे बांधकाम हे दगडी राहणार आहे. येथील देवीची मूर्तीही स्वयंभू राहणार असून, ज्याप्रमाणे तुळजापुरात तुळजभावानी देवीची पूजा-अर्चा होते, त्याच प्रमाणे तेथेही होणार आहे. तसेच मंदिर उभारणीसाठी तुळजाभावनी मंदिराचे फोटो शूट करणे, मंदिर संदर्भातील माहिती संकलनासाठी नितीन देसाई यांना चित्रपट दिग्दर्शक दिलीप भोसले हे सहकार्य करणार आहेत. शिवस्मारकाला भेटी देण्यासाठी देश-परदेशातील पर्यटक येणार असून, तेथेच त्यांना श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन होणार आहे. त्यामुळे या मंदिराचा फायदा तुळजापूरला देखील होणार असल्याचे दिग्दर्शक दिलीप भोसले यावेळी म्हणाले. (वार्ताहर)