बजाजनगरात तुकडोजी महाराज पोलखी सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 22:26 IST2019-07-22T22:25:59+5:302019-07-22T22:26:08+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पादुका पालखी दर्शन सोहळा उत्साहात संपन्न झाला.

बजाजनगरात तुकडोजी महाराज पोलखी सोहळा
वाळूज महानगर: श्री गुरुदेव सेवा आश्रम व ग्रामगीता अध्ययन केंद्रातर्फे बजाजनगर येथे रविवारी सायंकाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पादुका पालखी दर्शन सोहळा उत्साहात संपन्न झाला.
आषाढी यात्रे निमित्त दरवर्षी तुकडोजी महाराज यांच्या चरण पादुका पालखीची अ.भा. श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे प्रचार यात्रा काढली जाते. या पालखीचे रविवारी सायंकाळी बजाजनगर येथील श्री गुरुदेव सेवाश्रम व ग्रामगीता अध्ययन केंद्रात आगमन झाले.
यावेळी राजेश उघडे यांच्या हस्ते सपत्नीक पालखी पूजन करण्यात आले. त्यानंतर भाविकांनी मोठ्या संख्येने चरण पालखीचे दर्शन घेतले. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी खा. चंद्रकांत खैरे, मंडळाचे दामोदर पाटील, हनुमान भोंडवे, श्रीकांत साळे, अमित चोरडिया, एकनाथ साळे, काकाजी जिवरग, श्रीकृष्ण राठोड, खेमराज हिंगणकर आदींची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी संतोष जगताप, उत्तम वझळे, राजाभाऊ ठाकरे, नरेश देसकर, राजाभाऊ देशमुख, गजानन मानकर, मोहन हाडोळे, किरण चित्राले आदींनी परिश्रम घेतले.