मंगळवारपासून पुन्हा अतिक्रमण हटाव
By Admin | Updated: June 30, 2017 23:26 IST2017-06-30T23:22:31+5:302017-06-30T23:26:47+5:30
हिंगोली : शहरातील विविध भागात पालिकेच्या वतीने काही महिन्यांपूर्वी अतिक्रमण हटाव मोहीम राबविली होती.

मंगळवारपासून पुन्हा अतिक्रमण हटाव
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील विविध भागात पालिकेच्या वतीने काही महिन्यांपूर्वी अतिक्रमण हटाव मोहीम राबविली होती. शहरातील स्थिती पुन्हा ‘जैसे थे’ झाल्यामुळे मंगळवारपासून पुन्हा मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी केले आहे.
शहरातील विविध भागात अतिक्रमाणाचा विळखा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मागील काही दिवसांपूर्वी काढलेली अतिक्रमणे जसेच्या तसेच झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पालिकेच्या वतीने मंगळवारपासून अतिक्रमण काढले जाणार असून, मोकळ्या झालेल्या जागेत वृक्षलागवड केली जाणार आहे. अतिक्रमण हटावमध्ये कोणाचीही गय होणार नाही.