एकास जिवंत जाळण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: September 16, 2015 00:31 IST2015-09-16T00:07:00+5:302015-09-16T00:31:24+5:30
हसनाबाद : भोकरदन तालुक्यातील एकेफळ येथे घराबाहेर झोपलेल्या एका इसमास पेटवून दिल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी रात्री घडली.

एकास जिवंत जाळण्याचा प्रयत्न
हसनाबाद : भोकरदन तालुक्यातील एकेफळ येथे घराबाहेर झोपलेल्या एका इसमास पेटवून दिल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी रात्री घडली.
एकेफळ येथील भीमराव देवराव म्हस्के हे १३ सप्टेंबर रोजी आपल्या शेतातील घरासमोर बाजेवर झोपले होते. मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने त्यांना बाजेसह पेटवून दिले. त्यात ते ६० टक्के भाजले गेले. त्यांचा आवाज ऐकून घरातील इतर मंडळी जागे झाले. त्यांना विझवून तात्काळ उपचारासाठी भोकरदन ग्रामीण रूग्णालय व तेथून औरंगाबाद घाटी रूग्णालयात दाखल केले.
त्यांच्या एम एलसी जबाबावरून मंगळवारी हसनाबाद पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरूद्ध त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकाराने गावात एकच खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)