एटीएम फोडण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: February 3, 2015 00:57 IST2015-02-03T00:27:35+5:302015-02-03T00:57:41+5:30

जालना : जालना-मंठा मार्गावरील रामनगर येथे युनियन बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन चोरट्यांना गस्तीवर असलेल्या मौजपुरी पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

Trying to break the ATM | एटीएम फोडण्याचा प्रयत्न

एटीएम फोडण्याचा प्रयत्न


जालना : जालना-मंठा मार्गावरील रामनगर येथे युनियन बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन चोरट्यांना गस्तीवर असलेल्या मौजपुरी पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही घटना रविवारी मध्यरात्रीनंतर घडली. दरम्यान, चोरट्यांनी या गुन्ह्यासाठी वापरलेली मोटारसायकलही चोरीची असल्याचे उघडकीस आले आहे.
रामनगर येथील बालाजी गल्ली भागात मौजपुरी ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरवसे, पोलिस जमादार सय्यद मजीद व नाईक पोलिस कॉन्स्टेबल डी.एन. राऊत हे तिघे मध्यरात्री २.१५ ते २.३० या वेळेत गस्तीवर असताना एटीएमजवळ एक मोटारसायकल त्यांना उभी असलेली दिसली. एवढ्या रात्री एटीएममध्ये कोण आहे, हे तपासून पाहण्यासाठी पोलिस एटीएमजवळ गेले. त्याचवेळी दोन इसम एटीएम मशिनला हलवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना दिसले. पोलिसांना बघताच त्या दोघांनी तेथून पळ काढला, परंतु पोलिस कर्मचारी मजीद व राऊत यांनी २ ते ३ कि़मी. अंतरावर पाठलाग करून आरोपींना पकडले.
रज्जाक हसन तुंडीवाले (२५) व अफजल गफ्फार परसुवाले (२४, रा. दोघेही मजरेवाडी, ता. बदनापूर) अशी या आरोपींची नावे असून त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या ताब्यात एक सुरा, चाकू, कुऱ्हाड, पक्कड, हॅन्डग्लोज, मंकी कॅप व मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
या आरोपींची स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी चौकशी केली असता या गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही मोटारसायकल तालुका जालना पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्याचे आरोपींनी सांगितले. (प्रतिनिधी)४
मागील काही दिवसांपूर्वी जालना शहरात सदर बाजार हद्दीतील एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचे या आरोपींनी पोलिसांच्या चौकशीत सांगितले. या आरोपींकडून एटीएम, चैन स्रेचिंग, चोरी, घरफोडी यासारखे अन्य गुन्हे उघडकीस होऊ शकतात, असा अंदाज सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरवसे यांनी व्यक्त केला.
४पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग, अपर पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शहरातील वाढत्या चोऱ्या, घरफोड्यांसंदर्भात पोलिस अधीक्षकांनी ३१ जानेवारी रोजी सर्व प्रमुख पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.

Web Title: Trying to break the ATM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.