विवाहितेस पेटवून जीवे मारण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: March 13, 2016 14:26 IST2016-03-13T14:19:33+5:302016-03-13T14:26:36+5:30
हिंगोली : पूजा गौरीशंकर राठौर (२३) या विवाहितेचा छळ करून अंगावर रॉकेल टाकून पेटवून देत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे.

विवाहितेस पेटवून जीवे मारण्याचा प्रयत्न
हिंगोली : शहरातील तोफखाना भागात ११ मार्च रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पूजा गौरीशंकर राठौर (२३) या विवाहितेचा छळ करून अंगावर रॉकेल टाकून पेटवून देत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे.
नणंदेच्या लग्नासाठी आई-वडिलांकडून ३ लाख रुपये आण म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ होत होता. शिवीगाळ व मारहाण करून सासरच्या मंडळींकडून जीवे मारण्याच्या उद्देशाने रॉकेल ओतून पेटवून दिल्याने ती जखमी झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून पती गौरीशंकर रतनलाल राठौर, नणंद अलका रतनलाल राठौर, उषा अजय राठौर यांच्याविरूद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. (प्रतिनिधी)