विषारी औषध पाजवून मारण्याचा प्रयत्न; चौघांना शिक्षा

By Admin | Updated: March 13, 2015 00:39 IST2015-03-13T00:25:48+5:302015-03-13T00:39:00+5:30

जालना : विषारी औषध पाजवून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रांजणगाव ता.जि. औरंगाबाद येथील कपूरचंद आनंदराव काबरा व अन्य तीन आरोपींना येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.व्ही. देशमुख

Try to kill poisonous medicine; Education for four | विषारी औषध पाजवून मारण्याचा प्रयत्न; चौघांना शिक्षा

विषारी औषध पाजवून मारण्याचा प्रयत्न; चौघांना शिक्षा


जालना : विषारी औषध पाजवून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रांजणगाव ता.जि. औरंगाबाद येथील कपूरचंद आनंदराव काबरा व अन्य तीन आरोपींना येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.व्ही. देशमुख यांनी कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व दंडाची शिक्षा ठोठावण्याचा निर्णय १२ मार्च रोजी दिला.
पाचनवडगाव (ता. जालना) येथे ९ आॅक्टोबर २००९ रोजी सकाळी ९.३० वाजता सुनील खंदारे व त्यांची पत्नी नीता हे त्यांच्या शेतात काम करत असताना आरोपी संगनमत करून तेथे आले. कपूरचंद यांनी सुनील खंदारे यांची गळचेपी धरली. त्यानंतर श्याम काबरा व सुनीता काबरा यांनी मोटारसायकल नीता यांच्या अंगावर घातली. बाटलीतील औषध सुनील यांना पाजले.
या प्रकारानंतर सुनील व त्यांच्या पत्नीस उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी तालुका जालना पोलिस ठाण्यात आरोपी कपुरचंद आनंदराव काबरा, श्याम कपुरचंद काबरा, सुनीता श्यामसिंग काबरा, वैशाली श्यामसिंग काबरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सरकार पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी फिर्यादी, फिर्यादीची पत्नी, डॉ. संजय कुलकर्णी, तपासिक अंमलदार पोलिस उपनिरीक्षक एस.एन. शेख यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर उपलब्ध पुराव्यानुसार न्यायाधिश देशमुख यांनी वरीलप्रमाणे निर्णय दिला.
४घनसावंगी येथील मॉर्डन कॉलेजचे प्राचार्य संभाजी पाटील यांच्याविरूद्ध विद्यार्थिंनीचा विनयभंग केल्याप्रकरणी ९ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून ते फरार झाले होते. घनसावंगी पोलिसांना पाटील हे औरंगाबाद येथे असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस उपनिरीक्षक पवार, पो. कॉ. शेख अक्तर, राऊत, धाईत यांच्या पथकाने सिडको बसस्थानकावरून त्यांना सकाळी अटक केली. सांयकाळी घनसावंगी न्यायालयात हजर केले असता त्यांना जामीन मिळाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Try to kill poisonous medicine; Education for four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.