गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: July 17, 2014 01:08 IST2014-07-17T00:48:37+5:302014-07-17T01:08:56+5:30
वाशी : अनैतिक संबंधाच्या संशयावरून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून मंगळवारी वाशी पोलिस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे

गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न
वाशी : अनैतिक संबंधाच्या संशयावरून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून मंगळवारी वाशी पोलिस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भूम तालुक्यातील आंदरूड येथील ज्ञानेश्वर सोपान गिते हे ९ जून २०१४ रोजी उस्मानाबाद येथील काम आटोपून आंदरूडकडे जात होते. यावेळी ईटजवळील पांढरेवाडी पाटीजवळ वाशी तालुक्यातील वडजी येथील अॅड. किरण भास्कर जाधवर व भूम तालुक्यातील प्रवीण पोपट दराडे यांनी गिते यांची गाडी अडवून त्यांना बाहेर ओढून अनैतिक संबंधाच्या संशयावरून गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात गिते यांनी ईट येथील दूरक्षेत्रात तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल केला असल्यामुळे त्यांनी भूम येथील न्यायालयात दाद मागितली. सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाईचे आदेश न्यायालयाने दिल्यावरून वाशी पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६ (२), ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सपोनि विनोद मेत्रेवार करीत आहेत. (वार्ताहर)