दोन समाजात तेढ वाढविण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: August 4, 2014 00:48 IST2014-08-04T00:16:37+5:302014-08-04T00:48:40+5:30

बीड: माजलगाव धरणातील ठेका रद्द करण्यासाठी मच्छीमारांचे गेल्या दहा वर्षांपासून भांडण आहे. हा वाद ठेकेदार माणिकशहा व भोई समाजाच्या लोकांमध्ये असून याला जातीय रंग देण्यात येत आहे.

Try to increase the strength of two communities | दोन समाजात तेढ वाढविण्याचा प्रयत्न

दोन समाजात तेढ वाढविण्याचा प्रयत्न

बीड: माजलगाव धरणातील ठेका रद्द करण्यासाठी मच्छीमारांचे गेल्या दहा वर्षांपासून भांडण आहे. हा वाद ठेकेदार माणिकशहा व भोई समाजाच्या लोकांमध्ये असून याला जातीय रंग देण्यात येत आहे. त्यामुळेच हे प्रकरण गंभीर बनले आहे. पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी भोई समाजाच्या नागरिकांशी भेट घेऊन त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.
माजलगाव येथील कॅम्प परिसरात महिला पुरुष मच्छीमारांवर माजलगाव धरणाच्या ठेकेदाराच्या गुंडानी शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हल्ला केला होता. या हल्ल्यात आठ महिला व चार पुरुष गंभीर जखमी झाल्या होत्या. या प्रकरणी माजलगाव पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. धरणातील मासेमारीवरच भोई समाजाची उपजिविका आहे. मत्सव्यवसायाचे कंत्राट दिले असल्याने भोई समाजावर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे ते सतत संघर्ष करत आहेत.
यापूर्वी माजी न्या. कोळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणावर आंदोलन करण्यात आले होते. मच्छीमार वारंवार आंदोलन करीत असल्याने त्यांना गुंडाकरवी मारहाण केली जात असल्याचा आरोप जखमींनी केला आहे.
मारहाणीचे प्रकरण समोर येण्यापूर्वीच अ‍ॅट्रॉसिटी
गुंडांनी धरणाजवळ मच्छीमारांना मारहाण केली होती. मच्छीमार पोलीस ठाण्यात येण्यापुर्वीच सिद्धार्थ भानुदास साळवे यांच्या फिर्यादीवरुन उद्धव नाईकनवरे, पांडुरंग घटे, परमेश्वर घटे, गंगाधर घुंगासे, त्रिंबक कचरे यांच्या विरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती सुत्रांनी दिली. त्यानंतर सिद्धार्थ नाथा घडले यांच्या फिर्यादीवरुन आयुब आत्तार यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न
माजलगावात हिंदु-मुस्लिम बांधवांचा सलोखा कायम आहे. मात्र या वादात दोन समाजाच्या लोकांना ओढून वाद चिघळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे हे प्रकरण गंभीर बनत चालले होते. यावर पोलिसांना कठोर भूमिका घेऊन कोणाताही गैरप्रकार होणार नाही याच दक्षता घेतली.
‘त्या’ महिलेच्या गर्भपाताची शक्यता
माजलगाव येथील कॅम्प परिसरात महिला पुरुष मच्छीमारांवर माजलगाव धरणाच्या ठेकेदाराच्या गुंडांनी शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हल्ला केला. यात राधा लिंबोरे या गर्भवती महिलेच्या पोटावर गुंडानी लाथा मारल्या होत्या. त्यामुळे पोटातील बाळाचा गर्भातच मृत्यू झाला होता. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी गर्भ मृत झाला असल्याने तीन दिवसांत गर्भपात करण्याचा सल्ला दिला आहे. सोमवारी तिचा गर्भपात होण्याची शक्यता जिल्हा रुग्णालयात सूत्रांनी वर्तवली आहे.
विविध संघटनांकडून माजलगाव येथे झालेल्या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. बीड शहरातील जिल्हा रुग्णालयात तीन जखमींवर उपचार सुरू आहेत. घडलेल्या घटनेसंदर्भात बोलताना ते म्हणाले, गुंडांनी आम्हाला बेदम मारहाण केली. पुरुषांनी स्त्रियांवर हात उचलले हे कितपत योग्य आहे? असा प्रती सवालही त्यांनी केला. दरम्यान, ज्याठिकाणी जखमींवर उपचार सुरू आहेत त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या जखमींना कोणताही त्रास होऊ नये, याची पूर्ण काळजी घेतली जात आहे. शनिवारी दुपारी जखमींचे जबाब पोलिसांनी घेतले आहेत. रविवारी माजलगावमध्ये शांतता होती. (प्रतिनिधी)
अधीक्षकांनी घेतली माजलगावात बैठक
माजलगाव येथील दहा ते बारा जणांना शुक्रवारी मारहाण झाली होती. कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी म्हणून पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी शनिवारी माजलगावात तळ ठोकुन होते. त्यांनी भोई समाज वस्तीवर जाऊन बैठक व जखमींच्या कुटूंबियांशी चर्चा केली. माजलगाव येथे झालेल्या वादासंर्दभात बोलताना अधीक्षक रेड्डी म्हणाले की, मच्छीमार व ठेकेदार यांचा वाद अनेक वर्षापासून आहे. याला काही व्यक्ती जातीय रंग देत आहेत. काही व्यक्ती हे प्रकरणी चिघळविण्याचा प्रयत्न करत आहेत. नागरिकांनी कोणत्याही भुलथापांना बळी न पडता कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्याचे आवाहन अधीक्षक रेड्डी यांनी केले आहे.

Web Title: Try to increase the strength of two communities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.