ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By Admin | Updated: October 22, 2016 00:30 IST2016-10-22T00:15:02+5:302016-10-22T00:30:14+5:30
वडीगोद्री : ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकने दुचाकीस समोरासमोर धडक दिल्याने दुचाकीवारील एकजण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
वडीगोद्री : ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकने दुचाकीस समोरासमोर धडक दिल्याने दुचाकीवारील एकजण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास शहागड जवळील पैठण फाट्यावर घडली. दुचाकीस्वार सोमेश्वर यवल (४२, रा धाकली गोंदी)े असे मयताचे नाव आहे. तर राजू व्यवहारे (४०, रा. अंकुशनगर) हे गंभीर जखमी झाले आहेत.
औरंगाबादहून येणारा ट्र्क (एम. एच. १६ ए .ई ८७८९) बीडच्या दिशेने भरधाव जात होता. वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. दुचाकीचालक सोमेश्वर जागीच ठार झाला. मागे बसलेला राजू हा रस्त्यावर फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खाजगी वाहनाने औरंगाबाद येथे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या प्रकरणी पोलिसांत अपघातांची नोंद घेण्यात आली आहे. (वार्ताहर)