ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By Admin | Updated: November 8, 2015 23:37 IST2015-11-08T23:25:59+5:302015-11-08T23:37:28+5:30
वाशी : भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीस जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका ६५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला़ ही घटना

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
वाशी : भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीस जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका ६५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला़ ही घटना रविवारी सकाळी सोलापूर- औरंगाबाद महामार्गावरील कन्हेरी फाट्याजवळ घडली़
वाशी येथील सर्जेराव किसनराव कवडे (६५) हे रविवारी सकाळी त्यांच्या दुचाकीवरून शेताकडे जात होते़ त्यांची दुचाकी औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील कन्हेरी फ ाट्यानजिक आली असता उस्मानाबादहून बीडकडे जाणाऱ्या ट्रकने (क्ऱएमएच.२५.-यू.७४५५) दुचाकीस समोरून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात कवडे हे दुचाकीवरून १५ ते २० फ ूट उडून पडल्याने गंभीर जखमी झाले होते़ त्यांना उपचारासाठी येथील ग्रामीण रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी बोराडे यांनी सर्जेराव कवडे यांना मयत घोषित केले़ सर्जेराव कवडे यांच्या पाश्च्यात पत्नी, तीन मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पंजाब सर्जेराव कवडे यांचे ते वडिल होत़ पंजाब कवडे यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरूध्द वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास दप्तरात चालकाच्या नावाची नोंद केलेली नसल्याने त्याचे नाव आम्हाला सांगता येत नाही, असे पोलिसांनी सांगितले़