ट्रक झाला कारवर पलटी

By Admin | Updated: April 3, 2016 03:50 IST2016-04-03T03:50:14+5:302016-04-03T03:50:18+5:30

तुळजापूर : भरधाव वेगातील ट्रक तुळजापूर शहरानजीकच्या घाटशिळ परिसरातील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने कारवर पलटी झाला़ हा अपघात शनिवारी सकाळी घडला असून,

The truck turned over on the car | ट्रक झाला कारवर पलटी

ट्रक झाला कारवर पलटी


तुळजापूर : भरधाव वेगातील ट्रक तुळजापूर शहरानजीकच्या घाटशिळ परिसरातील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने कारवर पलटी झाला़ हा अपघात शनिवारी सकाळी घडला असून, या अपघातात एका डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील डॉ़ शिवप्रसाद महारूद्र कुठार (वय-३०) हे शनिवारी सकाळी त्यांच्या कारमधून (क्ऱएम़एच़२५-आऱ १७०७) तुळजापूरकडे येत होते़ त्यांची कार शहरानजीकच्या घाटशीळेच्या पायथ्याला आली असता भरधाव वेगात सोलापूरच्या दिशेने जाणारा ट्रक (क्ऱएम़एच़२७- एक्स़२४२१) कारवर पलटी झाला़ या अपघातात कारमधील डॉ़ शिवप्रसाद कुठार यांचा जागीच मृत्यू झाला़ घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली़ अपघातग्रस्त ट्रकचा चालक जेम्स मोहळ थामीयल याला पोलिसांनी ताब्यात घेतले़ याबाबत पवन तुकाराम वट्टे (रा़बारूळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास सपोनि पोवार हे करीत आहेत़ मयत डॉ़ कुठार यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे़ माळुंब्रा येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ दरम्यान, मयत डॉ़ शिवप्रसाद कुठार यांचे वडिलही वैद्यकीय क्षेत्रात काम करीत होते़ त्यांच्याप्रमाणेच त्यांचा मुलगा शिवप्रसाद कुठार यांनीही सोलापूर येथे वैद्यकीय शिक्षण घेतले होते़ ग्रामीण भागात विशेषत: माळुंब्रा, पांगरधरवाडी भागात त्यांचा दांडगा जनसंपर्क होता़ त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे़

Web Title: The truck turned over on the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.