ट्रकची ट्रॅव्हल्सला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:05 IST2017-09-04T00:05:16+5:302017-09-04T00:05:16+5:30

पुण्यावरून औरंगाबादला येणाºया वैष्णवी ट्रॅव्हल्सच्या बसला भरधाव ट्रकने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात ५ प्रवासी जखमी झाले

Truck Trails accident | ट्रकची ट्रॅव्हल्सला धडक

ट्रकची ट्रॅव्हल्सला धडक

लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : पुण्यावरून औरंगाबादला येणाºया वैष्णवी ट्रॅव्हल्सच्या बसला भरधाव ट्रकने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात ५ प्रवासी जखमी झाले. ही घटना एएस क्लब लिंक रोड चौकात रविवारी (दि.३) पहाटे घडली. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात
आले.
तुकाराम लक्ष्मण सोनवणे (४५, गोलेगाव, ता. लोहा जि. नांदेड) हे शनिवारी (दि.२) रात्री ११ वाजता वैष्णवी ट्रॅव्हल्सची पुणे-शेगाव बस (क्र. एमएच १२, एचबी- ५५६) घेऊन निघाले. बसमध्ये एकूण १८ प्रवासी होते. ते रविवारी औरंगाबाद मार्गे शेगावला जात असताना ५.४५ वाजेच्या दरम्यान औरंगाबाद-नगर महामार्गावरील एएस क्लब लिंक रोड चौकात पैठण लिंक रोडकडून लासूरकडे जाणाºया भरधाव ट्रकने (क्र डब्ल्यूबी - २३, डी - ९९४६) ट्रॅव्हल्स बसला चालकाच्या बाजूने जोराची धडक दिली.
या अपघातात बसमधील मनीषा गवई (२३), यमुना गायकवाड (६०), मोतीराम गायकवाड (७०), परमात्मा तिवारी (३०) व दयानंद तिवारी हे पाच प्रवासी जखमी
झाले.
घटनेची माहिती मिळताच वाळूज वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांनी जखमींना उपचारकामी १०८ रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल केले.

Web Title: Truck Trails accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.