ट्रक उलटल्याने सुपारी रस्त्यावर
By Admin | Updated: January 16, 2016 23:51 IST2016-01-16T23:49:07+5:302016-01-16T23:51:31+5:30
श्रीक्षेत्र माहूर : येथून ५ कि.मी. अंतरावर धनोडा फाट्याजवळ बंगळुरु - नागपूर सुपारी घेवून जात असलेल्या ट्रकला अपघात होवून ट्रक रस्त्यावर आडवा झाल्याने आठ तास वाहतूक खोळंबली.

ट्रक उलटल्याने सुपारी रस्त्यावर
श्रीक्षेत्र माहूर : येथून ५ कि.मी. अंतरावर धनोडा फाट्याजवळ बंगळुरु - नागपूर सुपारी घेवून जात असलेल्या ट्रकला अपघात होवून ट्रक रस्त्यावर आडवा झाल्याने आठ तास वाहतूक खोळंबली. त्यामुळे हजारो वाहनांची दुतर्फा कोंङी झाल्याची घटना १६ जानेवारी रोजी घडली.
शहरापासून विदर्भ हद्दीतून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर धनोडा येथून जात असलेल्या २६ टन सुपारी भरलेल्या ट्रकला पहाटे ४ वाजता समोरुन येणाऱ्या ट्रकने कट मारल्याने ट्रक (क्र. एम.एच.४०-एके- ३३४२ शर्मा फारगेट कॅरियर नागपूर हा ट्रक रस्त्याच्या खाली उतरला. नवीन काम असल्याने रस्त्याच्या कडेला साईड पट्यात मुरुम टाकलेला नसल्याने खालून वर येण्याच्या प्रयत्नात ट्रक उलटून रस्त्यावर आडवा पडला. यात ट्रकचालक दिनेश डोंगरे नागपूर हा गंभीर जखमी झाला. सदर ट्रक अशोक लेलॅन्ड २११८ मॉडेल आहे. ट्रक १२ टायर्सचा असूनही उलटल्याने आश्चर्य व्यक्त होत होते.
माहूर - नांदेड-यवतमाळ-पुसदकडे सकाळी लवकर जाणारी एस.टी. बसेस येथे जावून अडकल्याने व इतर हजारो वाहने धनोडा ते माहूर फाटा धनोडा ते हिवरा खडकापर्यंत लांब रांगा लावून उभे राहिल्याने वाहन धारकांसह प्रवाशांची कुचंबणा झाली.
शेवटी पोलिसांनी क्रेन आणून ट्रकला रस्त्याच्या बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली. (वार्ताहर)