ट्रक उलटला; संत्र्यांचे नुकसान
By Admin | Updated: March 27, 2016 23:50 IST2016-03-27T23:44:34+5:302016-03-27T23:50:18+5:30
साटंबा : हिंगोली तालुक्यातील साटंबा- हिंगोली रस्त्यावर संत्र्याने (५२० कॅरेट) भरलेला ट्रक २६ मार्चच्या रात्री ९ वाजता उलटल्याने शेतकरी भगवान दाजिबा घ्यार यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

ट्रक उलटला; संत्र्यांचे नुकसान
साटंबा : हिंगोली तालुक्यातील साटंबा- हिंगोली रस्त्यावर संत्र्याने (५२० कॅरेट) भरलेला ट्रक २६ मार्चच्या रात्री ९ वाजता उलटल्याने शेतकरी भगवान दाजिबा घ्यार यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
यावर्षी अत्यल्प पावसामुळे संत्र्याचे झाडे जगविणेही अवघड झाले होते. भगवान घ्यार या शेतकऱ्याने नवीन बोअर घेवून या झाडाला पाणी दिले. त्यानंतर कसाबसा मळा बागवानाला विक्री केला; परंतु नुकत्याच झालेल्या वादळीवारे आणि पावसामुळे संत्र्यांची पडझड झाली. त्यामुळे बागवानानेही परिसरातील मळे सोडून दिले. या शेतकऱ्यांने स्वत: विकण्याचा बेत केला; परंतु साटंबा ते हिंगोली पारोळा मार्गे संत्र्याचा भरलेला ट्रक भांडेगावजवळ वळण रस्त्यावर पलटी झाला. यामध्ये या शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले.
साटंबा ते हिंगोली या रस्त्यावरील कित्येक वर्षापासून साधे खड्डेही बुजविले नाहीत, परिसरातील राजकारणी आणि कंत्राटदार एकच असल्यामुळे या परिसरातील गावचा रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या नावाखाली बजेट उचलले जाते. कित्येक वेळेस खड्ड्यांची डागडुजी झाली तर ती दोन महिन्यामध्ये जैसे थे होत होते. त्यामुळे वाहनधारकांना या रस्त्यावर वाहन चालविणे अवघड झाले आहे.
रस्त्यावर मोठमोठे खड्डे झाल्याने असे अनेकदा अपघात होतात. याकडे कोणाचेही लक्ष जात नाही, हे विशेष. भांडेगाव ते पारोळा या रस्त्यावरील वळण रस्त्यावर अनेक वेळा अपघात होवून कित्येक ट्रक, जीप, आॅटो उलटून प्रवाशांना दुखापत झाली आहे. या रस्त्यामध्येच मोठमोठे खड्डेही पडले आहेत. त्यामुळे वाहनाचा तोल सांभाळणे शक्य नसल्याने अपघात होत आहेत, असे चालक सांगतात. (वार्ताहर)