सोयाबीनसह ट्रक पळविला
By Admin | Updated: June 30, 2014 00:37 IST2014-06-30T00:07:55+5:302014-06-30T00:37:24+5:30
लातूर : तालुक्यातील मुरुड शहरातून सोयाबीनने भरलेला ट्रक चोरीस गेल्याची घटना २९ जून रोजी सकाळी उघडकीस आली आहे.

सोयाबीनसह ट्रक पळविला
लातूर : तालुक्यातील मुरुड शहरातून सोयाबीनने भरलेला ट्रक चोरीस गेल्याची घटना २९ जून रोजी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेत सव्वा सहा लाखांचा ऐवज चोरीस गेला आहे. या प्रकरणी मुरुड पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला.
मुरुड येथील चालक किशोर बबन गुंड यांनी १०१ पोती सोयाबीनने भरलेला एमडब्ल्यूपी ८७०८ क्रमांकाचा ट्रक शनिवारी रात्री आपल्या दत्त नगरातील घरासमोर लावला होता. दरम्यान, रात्री १२ ते सकाळी ६ वाजेदरम्यान चोरट्यांनी सोयाबीनसह ट्रक पळवून नेल्याचे गुंड यांच्या सकाळी लक्षात आले. त्यांनी तातडीने मुरुड पोलिस ठाणे गाठून सोयाबीनसह ट्रक चोरीस गेल्याची तक्रार दिली. या घटनेत ६ लाख २८ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे गुंड यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार कलम ३७९ अन्वये चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून, तपास पोलिस उपनिरीक्षक गिते करीत आहेत.