ट्रकच्या धडकेत तरूण जागीच ठार
By Admin | Updated: January 12, 2015 14:16 IST2015-01-12T14:11:23+5:302015-01-12T14:16:26+5:30
येथील औद्योगिक वसाहत भागात एका मालवाहू ट्रकने दिलेल्या धडकेत एक दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री ८.३0 च्या सुमारास घडली.

ट्रकच्या धडकेत तरूण जागीच ठार
चंदनझिरा : येथील औद्योगिक वसाहत भागात एका मालवाहू ट्रकने दिलेल्या धडकेत एक दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री ८.३0 च्या सुमारास घडली.
दुचाकीस्वार काकासाहेब मोटे (वय ३३) हा तरुण औद्योगिक वसाहत भागातून जात असताना त्यास एम.एच.१२/टी.सी.७५७३ या क्रमांकाच्या ट्रकने जोराची धडक दिली. यात काकासाहेबच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेले. या अपघातात काकासाहेब जागीच ठार झाला. अपघातानंतर ट्रकचालक मात्र पसार झाला. याप्रकरणी गौरव मणिलाल पाटील यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक तपास पोहेकाँ नजीर शेख हे करीत असल्याची माहिती ठाणे अंमलदार सूर्यवंशी यांनी दिली. (वार्ताहर)