ट्रकची बसला धडक

By Admin | Updated: May 6, 2016 00:02 IST2016-05-05T23:57:36+5:302016-05-06T00:02:55+5:30

वाळूज महानगर : औरंगाबाद - नगर महामार्गावरील लिंकरोड चौकात अपघाताचे सत्र सुरूच आहे.

The truck hit the bus | ट्रकची बसला धडक

ट्रकची बसला धडक

वाळूज महानगर : औरंगाबाद - नगर महामार्गावरील लिंकरोड चौकात अपघाताचे सत्र सुरूच आहे. बुधवारी मध्यरात्री एसटी बसला भरधाव ट्रकने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात २१ प्रवासी व चालक, वाहक असे एकूण २३ जण जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
एसटी महामंडळाची बुलडाणा- पुणे बस (क्र. एमएच-१४ बीटी -४२९४) बुधवारी रात्री औरंगाबादहून पुण्याकडे जात होती. १.३० वाजेच्या दरम्यान लिंक रोड चौकात सिग्नल ओलांडत असताना पैठण लिंकरोडकडून लासूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रक (क्र.आरजे-१४ जीजी-७७४८) ने बसला मध्यभागी जोराची धडक दिली. अपघात घडताच ट्रकचालक पळून गेला. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी (पान २ वर)

Web Title: The truck hit the bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.