शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला उडवले, अपघातात महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 19:02 IST

नातीसह दुचाकीने जाणाऱ्या दाम्पत्याला भरधाव ट्रकने उडवले. या अपघातात दुचाकीस्वार महिला ट्रकच्या चाकाखाली आल्याने आॅन दी स्पॉट ठार झाली.

ठळक मुद्देप्रयागबाई बाजीराव राठोड(४५,रा.गाडीवाट)असे मृत महिलेचे नाव आहे. या अपघातात त्यांचा पती बाजीराव सिताराम राठोड(५५) आणि नात सुप्रिया सुनील राठोड(३)हे जखमी झाले.

औरंगाबाद : नातीसह दुचाकीने जाणाऱ्या दाम्पत्याला भरधाव ट्रकने उडवले. या अपघातात दुचाकीस्वार महिला ट्रकच्या चाकाखाली आल्याने आॅन दी स्पॉट ठार झाली. तर त्यांचा पती आणि नात यांना या अपघातात किरकोळ मार लागला.  हा भीषण अपघात शनिवारी दुपारी दिड ते पावणे दोन वाजेच्या सुमारास बीडबायपास रोडवरील गोदावरी टी पॉर्इंटजवळ घडला. 

प्रयागबाई बाजीराव राठोड(४५,रा.गाडीवाट)असे मृत महिलेचे नाव आहे. या अपघातात त्यांचा पती बाजीराव सिताराम राठोड(५५) आणि नात सुप्रिया सुनील राठोड(३)हे जखमी झाले. या अपघाताविषयी सातारा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राठोड दाम्पत्य हे बीडबायपास परिसरातील भारतमातानगर येथे नातेवाईकांकडे आले होते.राठोड यांचा मुलगा नितेश हा गिरनेर तांडा येथे विहिर खोदण्याचे काम करीत आहे. त्याला भेटण्यासाठी राठोड दाम्पत्य चिमुकल्या नातीसह शनिवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास मोटारसायकलने गिरनेर तांडा येथे जाऊ लागले. बायपासवरील गोदावरी टी पॉर्इंटजवळ ते असताना मागून वेगाने आलेल्या ट्रकने त्यांना धडक दिली. 

या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या प्रयागबाई रोडवर पडल्याने आणि ट्रकच्या मागील चाकाखाली आल्या. तर बाजीराव आणि सुप्रिया हे रस्त्याच्या डाव्या बाजूला फेकल्या गेल्याने त्यांना किरकोळ मार लागला. या भीषण अपघातात प्रयागबाई या घटनास्थळीच ठार झाल्या.अपघाताची माहिती मिळताच सातारा ठाण्याचे निरीक्षक भारत काकडे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी अपघाताचा गुन्हा नोंद करून  पोलिसांनी ट्रकचालकास ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक काकडे यांनी दिली.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसरroad safetyरस्ते सुरक्षाAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसDeathमृत्यू