टँकरचालक दाद देईनात

By Admin | Updated: June 20, 2014 01:11 IST2014-06-20T00:56:55+5:302014-06-20T01:11:01+5:30

वाळूज महानगर : टँकरचालकांच्या मनमानीमुळे वाळूजला पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाचा आदेश गुंडाळून मंजूर खेपा करण्यास टाळाटाळ केली जात आहे.

The truck driver | टँकरचालक दाद देईनात

टँकरचालक दाद देईनात

वाळूज महानगर : टँकरचालकांच्या मनमानीमुळे वाळूजला पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाचा आदेश गुंडाळून मंजूर खेपा करण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे रहिवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
वाळूज येथील पाणी प्रश्न गेल्या तीन महिन्यांपासून चर्चेत आहे. पाणीटंचाईकडे तहसील व ग्रामपंचायत गांभीर्याने बघत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. आज गावात आठ ते दहा दिवसांनी एक वेळ तोही कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने २४ मेपासून गावात १२ हजार लिटर क्षमतेच्या ५ टँकरद्वारे प्रत्येकी दोन खेपांनी पाणीपुरवठा सुरू केला आहे. या पाच टँकरचे पाणी ग्रामपंचायतीच्या विहिरीत सोडून नंतर नळ योजनेद्वारे गावात पुरविले जाते.
पूर्वी पाच टँकरच्या दोन खेपांऐवजी या टँकरचालकांना चार खेपा करण्याचे आदेश तहसीलने दिले होते. हा आदेश देऊन आठवडा झाला तरी वाढीव पाणीपुरवठा होत नाही.
आम्ही तक्रार केली
याविषयी सरपंच रंजना भोंड व उपसरपंच खालेद पठाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, टँकरच्या वाढीव खेपा करण्याचे आदेश पंचायत समिती व तहसील विभागाने दिले आहेत. मात्र, टँकरचालकांनी त्यास नकार दिला आहे. आदेश न पाळणाऱ्या टँकरचालकांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी आम्ही तहसीलदारांकडे केली आहे.

Web Title: The truck driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.