शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले; उंच उडाल्यानंतर टायरखाली आल्याने शिर झाले धडावेगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 15:10 IST

हा अपघात इतका भयंकर होता की, दुचाकीवरील त्या व्यक्तीचे शिर धडावेगळे झाले व रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडले.

ठळक मुद्देपोलिसांनी मृताचे सीमकार्ड त्यांच्या मोबाईलमध्ये टाकून नातेवाइकांना केला संपर्क

पाचोड : लोखंडाने भरलेला ट्रक व दुचाकीमध्ये अपघात झाल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना पाचोडमधील पावन काशी विश्वेश्वर मंदिरासमोर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातात ठार झालेल्या इसमाचे शिर धडावेगळे होऊन बाजूला पडले होते. गुलाब धांडू राठोड (४५, रा. पांगरा, जि. जालना) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत पाचोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायपूर-छत्तीसगड येथून लोखंडी पोल घेऊन अहमदनगरकडे जाणाऱ्या ट्रक (एम.एच. १६ सी.डी. ९५५८) हा गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पाचोडमधून जात होता. तेव्हा पैठणकडून आलेल्या दुचाकीला (एम.एच. २१ बी.ई. ०८४४) ट्रकने जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील इसम उंच उडाला व ट्रकच्या टायरखाली आल्याने चिरडला गेला. हा अपघात इतका भयंकर होता की, दुचाकीवरील त्या व्यक्तीचे शिर धडावेगळे झाले व रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडले. यावेळी आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी पाचोड पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस जमादार सुधाकरराव मोहिते, पोलीस हवालदार पवन चव्हाण, फिरोज बरडे व जीवन गुढेकर, होमगार्ड संतोष भुमरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. पाचोड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे.

सीमकार्ड टाकून नातेवाइकांना केला संपर्कअपघातात मृत्यू झालेल्या इसमाची ओळख पटली नव्हती. त्याचा मोबाइलचा देखील चुराडा झाला होता. पोलीस जमादार सुधाकर मोहिते यांनी ठार झालेल्या व्यक्तीच्या मोबाइलमधील सीमकार्ड काढून त्यांच्या मोबाइलमध्ये टाकले. त्यानंतर काही नातेवाइकांशी संपर्क केला. काही वेळानंतर त्या इसमाची ओळख पटली. गुलाब धांडू राठोड (४५, रा. पांगरा, ता. घनसावंगी, जि. जालना) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पाचोड पोलीस ठाण्यात अपघातांची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस जमादार सुधाकर मोहिते, पवन चव्हाण करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAccidentअपघातDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद