ट्रकने वृद्ध महिलेस चिरडले
By Admin | Updated: September 13, 2014 00:34 IST2014-09-13T00:13:38+5:302014-09-13T00:34:49+5:30
पाचोड : औरंगाबाद ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर देवगावजवळ ट्रकने एका सत्तर वर्षीय महिलेला चिरडल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.

ट्रकने वृद्ध महिलेस चिरडले
पाचोड : औरंगाबाद ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर देवगावजवळ ट्रकने एका सत्तर वर्षीय महिलेला चिरडल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.
ट्रकचालक पळून जात असताना पाचोड पोलीस व चिकलठाणा पोलिसांनी त्याला पकडले. देवगाव, ता. पैठण येथील मुक्ताबाई नानासाहेब गिते (७०) या आजारी असल्यामुळे त्या उपचारासाठी रजापूर येथील दवाखान्यात पायी चालल्या होत्या. याचवेळी बीडहून औरंगाबादकडे एक ट्रक सुसाट वेगात चालला होता. या ट्रकचालकाने त्या महिलेला चिरडले. त्यामुळे त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भयानक होता की, त्या महिलेचे शरीर छिन्न-विछिन्न झाले. अपघात झाल्यानंतर ट्रकचालकाने तेथून पळ काढला. तेव्हा आजूबाजूला शेतात काम करणाऱ्या मजुरांनी तात्काळ पाचोड पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी पोलीस अधीक्षक अनिल कुंभारे यांना माहिती दिली. कुंभारे यांनी चिकलठाणा पोलिसांना माहिती देऊन सर्वत्र नाकेबंदी केली. पाचोड पोलिसांनी पाठलाग करून हा ट्रक झाल्टा फाट्याजवळ पकडला व पाचोड पोलीस ठाण्यात आणला. त्या महिलेचे शरीर छिन्न-विछिन्न झाल्यामुळे पाचोड ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. (वार्ताहर)
याच मार्गावर देवगाव फाट्यावर कंटेनर व ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने कंटेनरमधील चालक माट्टी युसूफ (३३) रा. आंध्र प्रदेश हा गंभीर जखमी झाला. कंटेनर (क्र. एपी ३७ पी.ए. ४७३३) औरंगाबादहून पाचोडकडे येत होता. तर ट्रक (क्र. एम.एच. २५ यू ६५४७) पाचोडहून औरंगाबादकडे जात होता. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली.