शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
मोदींच्या सभेपूर्वी पोलिसांनी ठाकरे गटाच्या पाच कार्यकर्त्यांना उचलले; नाशिकमध्ये नजरकैदेत ठेवले
3
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
5
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
6
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
7
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
8
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
9
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
10
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
11
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
12
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
13
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
14
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
15
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
16
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
17
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
19
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
20
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत

पंढरपूरजवळ भरधाव ट्रकने मोपेडस्वारास चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 5:19 PM

मोपेडस्वार ट्रकखाली आल्याने गंभीर जखमी झाले

वाळूज महानगर (औरंगाबाद ) : वाळूजकडून औरंगाबादच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने पंढरपूरातील जामा मस्जिद समोर मोपेडस्वारास चिरडल्याची घटना शुक्रवारी (दि.२६ ) सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. अपघातात विठ्ठल श्रीपाद पोटदुखे (४० रा.कमळापूर फाटा) यांचा जागीच मृत्यू झाला तर समाधान यशवंत गव्हाणे (४१) हे गंभीर जखमी आहेत. 

या विषयी अधिक माहिती अशी की, समाधान यशवंत गव्हाणे (४१ रा.बोधवड ता.सिल्लोड) हे गुरुवारी (दि.२५) आपले मेव्हुणे विठ्ठल पोटदुखे यांना भेटण्यासाठी कमळापूर फाटा येथे आले होते. येथे मुक्काम केल्यानंतर आज सकाळी गव्हाणे परत निघाले. यावेळी पोटदुखे व गव्हाणे मोपेडवर ( एम.एच.२०, एफ.सी.२४३४) पंढरपूरच्या दिशेने निघाले

यावेळी पंढरपूरातील रांजणगावरोडवरुन जामा मस्जिदसमोर येताच वाळूजकडून औरंगाबादच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने (एम.एच.१८, बी.जी.३९८९) मोपेडला समोरुन जोराची धडक दिली. यात पोटदुखे हे ट्रकखाली आले तर गव्हाणे दूर फेकल्या गेले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बेशुद्ध अवस्थेतील दोघांनाही शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी पोटदुखे यांना तपासून मृत घोषित केले. समाधान गव्हाणे यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

दरम्यान, अपघातानंतर पलायन करणाऱ्या ट्रक चालक मोहसीन यासिन शेख (रा.बडवाणी जि.सेंदवा, मध्यप्रदेश) यास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.गणेश अंतरप हे करत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूWaluj MIDCवाळूज एमआयडीसी