कॅनॉटमधील मालमत्तांना मनपाने ठोकले ताळे
By Admin | Updated: October 1, 2014 00:39 IST2014-10-01T00:39:33+5:302014-10-01T00:39:33+5:30
औरंगाबाद : महापालिकेने आज कॅनॉट गार्डनमधील १९ दुकानांना मालमत्ताकर थकल्यामुळे ताळे ठोकले.

कॅनॉटमधील मालमत्तांना मनपाने ठोकले ताळे
औरंगाबाद : महापालिकेने आज कॅनॉट गार्डनमधील १९ दुकानांना मालमत्ताकर थकल्यामुळे ताळे ठोकले. करसंकलक व मूल्यनिर्धारक शिवाजी झनझन यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
प्रभाग अधिकारी सी. एम. अभंग यांनी सांगितले की, कॅनॉट गार्डनमध्ये १५० हून अधिक दुकाने आहेत. त्यांतील १० दुकानांकडे २० लाखांहून अधिक मालमत्ताकर थकलेला आहे. त्यामुळे दुपारनंतर दुकानांना ताळे ठोकण्याची कारवाई सुरू करण्यात आली. ७ दुकानदारांनी कराचा भरणा केला. त्यानंतर त्यांचे ताळे उघडण्यात आले. १ लाख ५६ हजार रुपयांचा कर पालिकेला मिळाला आहे. १ आॅक्टोबर रोजीही त्या भागामध्ये करवसुलीची मोहीम सुरू राहणार आहे.