किरकोळ कारणावरून सहा तरुण भररस्त्यावर परस्परांना भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:04 IST2021-05-26T04:04:21+5:302021-05-26T04:04:21+5:30

प्राप्त माहितीनुसार शिवाजीनगर येथील सहा तरुणांचर बुधवारी सायंकाळी हाणामारी झाली. यानंतर ते पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी ...

For trivial reasons, the six young men clashed with each other | किरकोळ कारणावरून सहा तरुण भररस्त्यावर परस्परांना भिडले

किरकोळ कारणावरून सहा तरुण भररस्त्यावर परस्परांना भिडले

प्राप्त माहितीनुसार शिवाजीनगर येथील सहा तरुणांचर बुधवारी सायंकाळी हाणामारी झाली. यानंतर ते पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्याना मेडिकल मेमो दिले आणि घाटीत उपचारांसाठी पाठविले. दोन दुचाकीवरुन सहा जण घाटीत जात असताना नूतन कॉलनी येथे त्यांच्यात पुन्हा हाणामारी झाली. यावेळी एकाने कोयता उगारला मात्र लोक जमा होत असल्याचे पाहून भांडण थांबवून ते पुढे निघाले. तेथून औरंगपुरा जिल्हा परिषदेसमोर त्यांच्यात पुन्हा भांडण सुरू झाले. याचवेळी गस्तीवरील पोलिसांनी त्यांना पकडले. यावेळी एकाच्या हातातील कोयता पोलिसांनी जप्त केला. यावेळी त्यांनी त्यांच्यातील भांडण मिटल्याचे पोलिसांना सांगितले. यामुळे सरकारतर्फे त्यांच्याविरुध्द सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Web Title: For trivial reasons, the six young men clashed with each other