चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती
By Admin | Updated: July 18, 2014 01:46 IST2014-07-18T00:22:18+5:302014-07-18T01:46:31+5:30
बीड : धारुर तालुक्यातील भोगलवाडी येथील मुख्याध्यापक व शिक्षकांच्या बदलीसाठी ग्रामस्थांनी उपोषण सुरु केले आहे.

चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती
बीड : धारुर तालुक्यातील भोगलवाडी येथील मुख्याध्यापक व शिक्षकांच्या बदलीसाठी ग्रामस्थांनी उपोषण सुरु केले आहे. तेथील शिक्षकांच्या चौकशीसाठी गुरुवारी शिक्षणाधिकाऱ्यांनी त्रिसदस्यीय समिती नेमली.
भोगलवाडी येथे जि.प.ची शाळा आहे. तेथील मुख्याध्यापक, तीन शिक्षक व एका सेविकेच्या विरोधात ग्रामस्थांनी आंदोलन सुरु केले आहे. त्यांच्या बदलीच्या मागणीवर गावकरी ठाम आहेत. गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु कले आहे. शिक्षणाधिकारी (प्रा.) एस. वाय. गायकवाड यांनी दखल घेतली. बुधवारी त्यांनी भोगलवाडीत शाळेची पाहणी केली. शाळेचे आर्थिक अभिलेखे, विद्यार्थ्यांची गुणवत्ता याच्या चौकशीचे आदेश गायकवाड यांनी दिले आहेत़ (प्रतिनिधी)
यांची होईल चौकशी
मुख्याध्यापक जी. एस. चाटे, शिक्षक अर्जुन मुंडे, माणिक मुंडे, शिपाई जी. एम. घुले यांची चौकशी केली जाणार आहे. वडवणीचे गटशिक्षणाधिकारी वसंत जायभाये, धारुरचे गटशिक्षणाधिकारी यू. डी. कुलकर्णी, शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी डी. व्ही. धोत्रे यांची समिती चौकशी करणार आहे.
तीन दिवसांची मुदत
चौकशीसाठी नियुक्त समितीला तीन दिवसांची मुदत दिली आहे. ही समिती आपला वस्तुनिष्ठ अहवाल शिक्षणाधिकारी (प्रा.) एस. वाय. गायकवाड यांना सादर करेल. त्यानंतर अहवाल जिल्हाधिकारी व वरिष्ठांना सादर केला जाईल. अहवाल आल्यावरच कारवाईची दिशा ठरवावी लागेल, अशी प्रतिक्रिया शिक्षणाधिकारी गायकवाड यांनी ‘लोकमत’ला दिली.